कुंडल वन प्रबोधिनी येथे कोषागार दिन साजरा करण्यात आला. यावेळी महासंचालक जे.पी.त्रिपाठी, संचालक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांचे हस्ते आंबा वृक्षाची रोपे लावण्यात आली.
सत्रसंचालक रामदास पुजारी, सेवानिवृत्त कोषागार अधिकारी बी.एम. गोपाळे, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक सुखदेव खोत , डी.डी.शेटे,संचालनालय, लेखा व कोषागारे अंतर्गत ५४ लेखाधिकारी व सहायक लेखा अधिकारी ,प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कुंडल वन प्रबोधिनी येथे संचालनालय, लेखा व कोषागारे अंतर्गतचे लेखा अधिकारी व सहायक लेखा अधिकारी यांचे ५ दिवसीय उजळणी प्रशिक्षणसंपन्न झाले. सहायक लेखाधिकारी प्रशांत थोरात यांनी कोषागार दिन साजरा करण्यामागची भूमिका विशद केली. महेश भांगरे, जयंत कुलकर्णी, संजय शेलार,जयेश मालंडकर, संतोष मोरे, मनीषा परब, प्रीती बुआ, शुभांगी तुपसाखरे,उषा मेमाणे यांचा सहभाग होत.
प्रबोधिनीतील वृक्षांची ओळख व्हावी म्हणून वृक्षांना क्यूआर कोड लावण्याच्या कामाचाही शुभारंभ झाला. मोबाईलवर कोड स्कॅन केल्यानंतर प्रशिक्षणार्थी व इतर अभ्यासकांना ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. वनस्पतीबद्दल आणखी माहिती हवी असल्यास स्पीकिंग ट्री च्या माध्यमातून वृक्षच आपल्याशी बोलू लागतील व त्यांचेबद्दल माहिती सांगतील. महासंचालक व संचालक यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही योजना पुण्याच्या डॉ. श्रीनाथ कवडे यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे.
0 Comments