शिराळा,ता.२: शिराळा येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत सम्राट केसरी २०२४ ची मानकरी यशवंत रामभाऊ जोशी (अबंरनाथ) यांची बैलजोडी ठरताच प्रेक्षकांनी खचाखच्च भरलेल्या मैदानात एकच जल्लोष करण्यात आला. विजेत्यां गाडी मालकांच्यावर बक्षिसांची खैरात करण्यात आली.
अवश्य पहा बैलगाडी शर्यत सौजन्य p 3 live 👇
बैलगाडा शर्यतीची बंदी उठल्यानंतर प्रथमच शिराळ्यात माजी नगरसेवक व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे यांनी सम्राट केसरी २०२४ बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यत पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने बैलगाडा प्रेमींनी उपस्थिती दर्शवली. सम्राट केसरी २०२४ ची मानकरी यशवंत रामभाऊ जोशी(अबंरनाथ) यांची बैलजोडी ठरली. विजेत्यांवर लाखो रूपयांच्या बक्षिसांची खैरात करण्यात आली.
यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडीक, भाजपा शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडीक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष के.डी पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ, जि.प.चे माजी सभापती जगन्नाथ माळी, शिराळा मंडलचे अध्यक्ष हणमंतराव पाटील, माजी सरपंच देवेंद्र पाटील, विश्वास कदम, शिवाजीराव महाडीक, उत्तमराव निकम, यावेळी मुख्याधिकारी नितिन गाढवे,रूपेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. द्वितीय क्रमांक वैष्णवी मोहन मदने (पेठ), तिसरा क्रमांक श्रीराम मोहिते(शिवाजीनगर), चौथा क्रमांक सुजित भोसले(मोरगाव), पाचवा क्रमांक पै.दत्ता गायकवाड( वडकी),सहावा क्रमांक राजू पाटील (वाटेगाव),सातवा क्रमांक जावेद मुल्ला (तांबवे) यांच्या बैलजोडीने पटकवला.यावेळी प्रतापराव पाटील, संजय गांधी योजनचे सदस्य सरगम मुल्ला, विजय गराडे, सम्राट शिंदे, विक्रम पाटील, सुजीत थोरात, चंद्रकांत पाटील, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शुभम महाडीक, लालासाहेब तांबीट, वसंत कांबळे, विरेंद्र पाटील, इंद्रजीत खडके उपस्थित होते. या स्पर्धेचे संयोजन राहुल खबाले, सौरभ नलावडे, अमित भोसले, सचिन दिवटे, रामभाऊ जाधव, मंदार उबाळे, हारूण शेख,अमित माने, वैभव इंगवले यांनी केले. निवेदक म्हणून सुनील मोरे,रणजित बनसोडे, चंद्रकांत कोकाटे, प्रकाश महागावकर तर झेंडा पंच म्हणून राजेंद्र धनवडे यांनी काम पाहिले .
नेटके नियोजन आणि नेत्रदीपक मैदान
शिराळ्याचे माजी नगरसेवक केदार नलवडे यांनी या बैलगाडा शर्यतीच्या मैदानाचे अतिशय सुंदर व नेटके नियोजन केले होते. प्रेक्षकांसाठी मनोरंजनासाठी लावण्याचा कार्यक्रम होता. या शर्यतीसाठी ग्रामीण भागातील हजारो बैलगाडा प्रेमींनी गर्दी केली होती.
हे बैल ठरले मैदानाचे आकर्षण
शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या मैदानात मोहोळचा बकासुर ,घरनीकी चा राजा , एम. एम. नानाचा राजा , शिरसवडीची रायफल,तांबव्याचा सर्जा असे शर्यतीत चपळ असणारे बैल ठरले मैदानाचे आकर्षण
मैदानात आलेल्या प्रेक्षकांना बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला यावा म्हणून दोन क्रेन च्या माध्यमातून १२ x ४० ची भव्य स्क्रीन लावण्यात आली होती.त्यामुळे प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत झाला.
लाखोंच्या बक्षिसांची खैरात
प्रथम बक्षीस- दोन लाख तीन हजार तीन ,द्वितीय -एक लाख ५३ हजार ३, तृतीय- एक लाख तीन हजार तीन, चतुर्थ क्रमांक ७३ हजार तीन, पाचवा - ५३ हजार ३ , सहावा क्रमांक २३ हजार 3, सातवा क्रमांक 13003 .
0 Comments