शिराळा :शिराळा येथे अभाविपच्या विद्यार्थांनी शाळा,महाविद्यालयाला जाण्यासाठी वेळेवर बस नसल्याने बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थीनी अभ्यासाला बसून वाहतूक थांबवून आंदोलन केले.
शिराळा तालुका हा डोंगरी तालुका आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापर्यंतच गावात सोयी उपलब्ध आहेत. पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिराळा, इस्लामपूर या ठिकाणी जावं लागतं. त्यासाठी विद्यार्थी एसटी बसने प्रवास करत असतात. पण मागील काही दिवसांपासून शिराळा तालुक्यातील अनेक गावांना शाळा, कॉलेजला येण्यासाठी व नंतर घरी जाण्यासाठी वेळेवर बस नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा महाविद्यालायला जावं लागत. घरी जाण्यासाठी बस नसल्याने रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी बस स्थानकावरच असतात. विद्यार्थ्यांना एसटीच्या गलथान कारभारामुळे, वेळेवर बस नाहीत, वारंवार निवेदन देऊनही बस सुरू न केल्याने बस स्थानकावरच अभ्यास करत बस रोकली.एस .टी प्रशासनाकडून बस सुरू करण्याचे व सर्व समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी अभविपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्निल पाटील, सुजित पाटील,अनुज पाटील,निलेश आवटे,साहिल पाटील आणि विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments