शिराळा येथे पत्रकार दिना निमित्त विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
शिराळा येथील संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन येथे जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्था,जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी, संकल्प फाऊंडेशन शिराळा, जिजाऊ फाऊंडेशन ट्रस्ट, पुणे, भारतीय दलित महासंघ, स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागृत ग्राहकराजा सामाजिक संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य व सांगली जिल्हा पालक अनंत खोचरे होते. यावेळी ग्राहकराजा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हंबीरराव देशमुख, जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी अध्यक्षा सरोजिनी कदम, संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रवि यादव, जिजाऊ फाऊंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश नांगरे,भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष दयानंद शिवजातक,जिल्हा उपाध्यक्ष विनोद आढाव,स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. जयदीप नलवडे, दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक डॉ. कृष्णा जाधव यांनी केले. यावेळी हंबीरराव देशमुख, ॲड. नेहा सुर्यवंशी, रवि यादव, दयानंद शिवजातक, डॉ. जयदीप नलवडे, डॉ. सुधाकर वायदंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विठ्ठल नलवडे, दिनेश हसबनीस, विकास शहा, संजय घोडे, विनायक गायकवाड, प्रितम निकम, संतोष बांदिवडेकर, अजित महाजन, आनंदा सुतार, रणजित चव्हाण, प्रताप कदम, धनाजी कोतवाल, दत्तात्रय पाटील, भास्कर गुरव, विशाल खुर्द, रवि यादव, जितेंद्र गायकवाड, हंबरराव देशमुख, डॉ. शिवाजीराव चौगुले यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी साधना पाटील, सविता नलवडे, छाया नलवडे, रेश्मा पवार, वैशाली पाटील, प्रज्ञा चरणकर, ज्योती गुरव, हर्षवर्धन नांगरे पाटील उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचलन गणेश यादव यांनी केले. आभार जितेंद्र गायकवाड यांनी मानले.
0 Comments