शिराळा:ऐतवडे खुर्द ( ता.वाळवा ) येथील पर्वतवाडी परिसरात चिराच्या बेटात अडकलेल्या जुन्या मासे पकडण्याच्या गळा मध्ये अडकून एका मोराचा मृत्यू झाला.या मोराचे आज मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.ही घटना सोमवार ता.४ रोजी दुपारी तीनच्या पूर्वी घडली.
याबाबत माहिती अशी की , वनविभागाच्या रेड ( ता.शिराळा ) च्या बिट मधील या गावातील पर्वतवाडी येथील चावरे पाणंद मधील वारणा नदी काठावर असणाऱ्या चिराच्या बेटावर मासे पकडण्यासाठी असणारा जुना गळ होता.याठिकाणी मोर उडताना त्याचा पंख त्यात अडकला त्यामुळे तो जखमी होऊन मृत्यू झाला.सदरची माहिती मिळताच वनविभागाचे विशाल डुबल , एस डी पाटील , प्राणीमित्र युंनुस मणेर , रोजंदारी मजूर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन पंचनामा केला. ता .४ रोजी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आज मंगळवारी मृत मोराचे शवविच्छेदन करण्यात आले. याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
0 Comments