शिराळा,ता,१८:हत्तेगाव (ता.शिराळा) पैकी अंबाबाईवाडी यथील शालन ज्ञानदेव आस्वले यांच्या कोकरावर जाळीच्या आडोशाला लपलेल्या बिबट्याने हल्ला करून ठार केली. ही घटना आज सोमवार ( ता. १८ ) रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. भर दुपारी अचानक झालेल्या या हल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी की,अंबाबाईवाडीच्या माळावर असणाऱ्या कळकीच्या डोंगरात शालन यांच्या सूनबाई राणी आस्वले ह्या दोन शेळ्या,दोन कोकरांना घेऊन चारण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक जाळीच्या आडाला लपेल्या बिबट्याने येऊन कोकरावर हल्ला केला.त्यात कोकरू ठार झाले.यावेळी परिसरात गवत काढण्यासाठी असलेल्या मंगल पवार,लता पवार, शांताबाई पवार,मारुती वाघमारे, सुमनआस्वले,मनीषा पवार,अनिता पावर,सुनीता उंडाळकर, भगवान पवार, विष्णू उंडाळकर,ओंकार उंडाळकर व इतर असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या कोकारस तिथेच सोडून पळून गेला. या बाबत वनविभाग कळवले असता वनरक्षक स्वाती कोकरे,वैभव गुरव,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक आटूगडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील विठ्ठल उंडाळकार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी उंडाळकार,माजी उपसरपंच संदीप चोरगे,संभाजी पवार ,दादासो पवार उपस्थित होते.
0 Comments