शिराळा,ता.१६ :गिरजवडे (ता. शिराळा ) येथे ट्रान्सफाॅर्मवरच्या वीजेचा धक्का लागून दोन वांनरांचा मृत्यू झाला .त्यांच्यावर गिरजवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गिरजवडे येथे ट्रान्सफाॅर्मवरच्या विजेच्या वायरीचा धक्का बसल्याने त्या ठिकाणी खेळत असणाऱ्या दोन वांनरांचा मृत्यू झाला.यामध्ये एक मादी व तीचे लहान पिलू यांचा समावेश आहे. यावेळी वनविभाग व विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाचे वनपाल अनिल वाजे ,वनरक्षक स्वाती कोकरे , वन कर्मचारी दादा शेटके , शिवाजी सावंत , संतोष कदम यांनी सदर मृत वांनराना खाली काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
0 Comments