शिराळा,ता.7 :मराठेवाडी-करुंगली(ता.शिराळा) येथे चार चाकी गाडीचा अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या शिराळा येथील चिन्मय प्रताप पोटे(वय २५)या युवकाचा मृत्यू झाला.इतर जखमींवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात मंगळवार दि.५ रोजी रात्री १० च्या दरम्यान घडला.
याबाबत समजलेली माहिती अशी, चार चाकी गाडी चांदोलीहुन शिराळ्याकडे येत असता चांदोली- कोकरूड या मुख्य रस्त्यावरील मराठेवाडी-करुंगली हद्दी लगत असणाऱ्या कारंडे यांच्या शेता जवळ या चार चाकीचा अपघात झाला.त्यातील इतर जखमीना व चिन्मय यास उपचारासाठी कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन जात असता चिन्मय पोटे या युवकाचा मृत्यू झाला. याबाबत कृष्णा रुग्णालयाचे अजित अनिल पवार यांनी कोकरूड पोलीस ठाण्यात मृत्यू बाबत माहिती दिली आहे. पुढील तपास हवालदार विनोद पाटील हे करीत आहेत. चिन्मय याच्यावर शिराळा येथे बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याच्या पश्चात वडील, आई , बहीण असा परिवार आहे.
0 Comments