वारणावती ,ता.४:पणुंब्रे .वारुण (ता.शिराळा) येथे श्री शिवप्रतिष्ठान कला, क्रिडा, सामाजिक आणि बहुउद्देशीय मंडळामार्फत आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धेत लहान गटात शिव गणेश मंडळ(सोनार गल्ली) तर मोठ्या गटात धर्मरक्षक ग्रुप यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
दुर्ग संवर्धन काळाची गरज या संकल्पनेखाली स्पर्धे बरोबरच मुलांमध्ये इतिहास अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश होता. जवळपास २५ किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आली होती.स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. यामध्ये लहान गटामध्ये प्रथम क्रमांक जंजिरा-शिव गणेश मंडळ(सोनार गल्ली), द्वितीय क्रमांक मल्हारगड- शिवस्पर्श ग्रुप(मधली गल्ली), तृतीय क्रमांक रायगड - साईराज पाटील(काळूंद्रे), चतुर्थ क्रमांक राजगड- आशिष पाटील यांनी पटकावला.
मोठ्या गटामध्ये धर्मरक्षक ग्रुप (राजगड), SGM ग्रुप (पन्हाळा), शिवतेज ग्रुप,पाटील गल्ली( खांदेरी उंदेरी) आणि राजे युवा ग्रुप,खुंदलापूर (राजगड) तर राजे ग्रुप,मोहिते वसाहत(सिंधुदुर्ग) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले.
रायगड,जाणता राजा ग्रुप(सुंदरनगर),राजगड विराज पाटील,मल्हारगड (काळूंद्रे),वासोटा(शिवप्रतिष्ठान ग्रुप)यांना उत्तेजनार्थ बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी पै. संदीप पाटील, प्रतिक तेली, संदीप पाटील, दिनकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. सानिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार धनाजी पाटील यांनी मानले .
0 Comments