BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गुजरवाटीतील तरुणांच्या जिद्दीला सलाम Salute to the determination of Gujrwati youth

 



धनाजी पाटील ?ऐतवडे खुर्द 

ऐतवडे खुर्द गावच्या  नदीजवळ असणाऱ्या मसोबाच्या मूर्तीची सोबत एक अघटीत घटना घडली. त्या घटनेचा  बाऊ न करता त्यातून सकारात्मक उर्जा घेवून युवकांनी त्या  देवालयाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. आजची तरुणाई ही वेगळ्या दिशेला भरकट चालली असल्याचे बोलले जात असताना मात्र त्या गोष्टीला दख्खनचा राजा गणेश मंडळाच्या युवकांनी छेद देत इतरांना प्रेरणादायी ठरले असे काम कृतीतून सिद्ध केल्याने  त्या गुजरवाटीतील तरुणांच्या जिद्दीला सलाम करावासा असे प्रत्येकास वाटत आहे.  

गावात  मासोबा  मंदिर गेल्या अनेक वर्षापासूनच आहे.  वारणा नदीच पात्र संपल की पहिलं मंदिर आहे, त्या मंदिरा पुढ गाव सुरू होतं. त्यास  पाणबुडी मसोबा म्हणतात. वर्षातून दोनदाच गावची यात्रा आणि आषाढ महिन्यात असे दोन वेळा जातात. त्यामुळेच मंदिर थोडं दुर्लक्षित राहिलं. गेल्या सहा महिन्यापूर्वी अघटीत घटना घडली. त्यामुळे या मंदिराकडे  गावाच लक्ष जाऊन  मंदिर सुशोभिकरण करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. मंदिर गुजरवाटी जवळ आहे, त्यामुळे तिथं असणाऱ्या दख्खनचा राजा गणेश मंडळात याची रोजच चर्चा होतं होती. अखेर गुजवटी येथील दख्खनचा राजा गणेश मंडळाने हे काम तडीस घेऊन जायचं, म्हणून प्रयत्न करु लागले.या वर्षी गणेशोत्सवाचा खर्चही कमी केला. यातून पैसे वाचवून मदिरासाठी खर्च करण्याचे नियोजन केले.प्रथम  मंदिराचा इतिहास शोधून  मूर्ती कशी बनवायची याचा विचार केला.मंदिराच्या बांधकामाचा प्रवास सुरू झाला. मंडळातील युवकांनी मंडळा जवळा असणाऱ्या  पैशावर व स्वत:च काम करुन हे मंदिर पूर्ण करण्याचे ठरवले.  मंडळातील तरुणांनी सेंट्रींग, गवंडी , लाईट फिटींग, प्लॅब्लिंग, पेंटींग कामे  स्वत: केली. यामुळे पैशाची बचत झाली.

साहित्यासाठी  पैशाची गरज भासू लागली. त्यावेळी युवकांनी गावातून स्व इच्छे ने  वर्गणी  देण्याची विनंती केली. लाखो रुपयांच्या गोळा झालेल्या  वर्गणीतून मंदिर पूर्णत्वास आले. नुकताच म्हसोबा मंदिराची  वास्तुशांती व प्राणप्रतिष्ठापणा झाली. यावेळी परमपुज्य धनंजय महाराज व सर्व विधी सचिन जंगम यांच्या सहकाऱ्यानी  विधीवत पार पडले..५ हजार लोकांचा महाप्रसाद बनवण्यात आला होता. महिलांना प्रसाद घेण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती,गुजवाटी येथील महिलांनी गावातील महिलांना प्रसाद वाटण्याचे काम केले.

या साठी दख्खनचा राजा गणेश मंडळातील सर्जेराव  पाटील,भैरवनाथ आरती मंडळ, सचिन पाटील,अमित पाटील, कृष्णात  माळी, सरपंच संभाजी पाटील,रोहित पाटील,  डॉ.ज्योत्स्ना पाटील, संतोष पाटील, दिनकर पाटील, आबासाहेब माने, रघुनाथ पवार, भैरवनाथ यात्रा कमिटी ग्रामपंचायत ऐतवडे खुर्द. तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments