BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीतून सांगलीला देण्यात येणाऱ्या थेट पाण्यास विरोध Opposition to direct water supply from Chandoli to Sangli



शिराळा, ता. ५:चांदोलीतून सांगली मिरज कुपवाड शहराना  शुद्ध पाणी देण्याचा घाट घातला जातो याला आंमचा कडाडून विरोध राहीलच . पण वारणा धरणातून शिराळा तालुक्यातील पश्चिम   भागातील वंचित गावे ,वाडया वस्त्या,गुढे पाचगणी पठार,शिराळा उत्तर भाग  ,पाटण तालुक्यातील भुरभुशी वाड्या वस्त्या परिसर आदी  भागाला  हक्काचे  पाणी चांदोलीतून  देण्याचे नियोजन पूर्ण करावे . अन्यथा श्रमिक मुक्क्ती दल ,पाणी वाटप संघर्ष चळवळीच्या वतीने डॉ.भारत पाटणकर यांचे अध्यक्षतेखाली तीव्र लढा उभारु असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील यांनी  पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी पाटील म्हणाले, वारणा धरण शिराळा तालुक्यात असताना शिराळा पश्चिम भागातील वंचित गावे,वाड्या वस्त्या उत्तर भागासाठी अद्याप पाणी मिळालेले नाही.येथील चांदोली ते रिळेपर्यंतच्या मंजूर  उपसा सिंचन योजना शासनाने पुर्ण करुन पाणी प्रश्न सोडवावा.  वारणा धरणा मध्ये १९९१पासून पाणी अडवण्यात येत असून त्याला ३२ वर्ष झाली तरी देखील संपूर्ण शिराळा तालुक्याला अध्याप पाणी मिळालेले नाही.असे असताना जे सांगली शहर कोयना धरणाच्या पाण्यावर किंवा कोयना धरणाच्या लाभक्षेत्रात त्यानी थेट वारणेचे पाणी नेणे हा शिराळा तालुक्यवर अन्याय आहे.शिराळा तालुक्याने या धरणासाठी त्याग केला आहे.अनेक गावाना पुनर्वसित म्हणून रहावे आणि त्याचे जगण्याचे प्रश्न चाळीस वर्ष झाले तरी सुटलेले नाहीत.आमचा थेट पाईपलाईन योजनेला  विरोध आहे.सांगलीला कृष्णा नदीचे पाणी कोयनेतून भरपूर येते ते पाणी दूषित कोणी केले. आणि शिक्षा कोणाला देता.आपण कोणाचे पाणी पळवत आहात?इथली लोकं शेतीला पाणी नसल्याने हमालीसाठी मुंबई ला  जाताहेत.त्याच्या शेतीला पाणी मिळाले शिवाय ते  सुखी होणार नाही.पर्यायाने मुंबईचा लोंढा गावाकडे राहिल.यासाठी आमचा वारणेच्या पाण्याचा अट्टाहास आहे.तो आम्ही कदापि सोडणार नाही. मे २०२३ रोजी खराळे ता .शिराळा  येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.पाटणकर यांचे अध्यक्षते खाली तालुक्यातील,शेतकर्याच्या  उपस्थितीत  झालेल्या पाणी परिषदेत इथल्या वंचित गावे वाड्या वस्त्या, वाकुर्दे परिसर, पाटण तालुक्यातील गावाना शेतीस पाणी देऊन ओलिताखाली आणून मुंबईचा लोंढा थाबवणे साठी निर्धार केला आहे. डिसेंबर २०२३अखेर  डॉ पाटणकर यांचे नेतृत्वा खाली या विभागातील  शेतकर्याचा मेळावा होणार आहे.यामधे वंचित भागाला हक्काचे  पाणी देण्याचा निर्धार लढा  सुरु करणार आहे.

 कृष्णेचे पाणी प्रदुषित, दुषित होण्यामागची कारणे शोधून प्रदूषण  करणाऱ्याना  त्याची जबाबदारी घ्यायला लावून.त्यावर ऊपाय सुचवण्यासाठी चर्चासत्र व्हायला हवे होते.मात्र दुषित पाण्याचे कारण पुढे करुन चांदोलीतून शुद्ध पाण्यासाठी  रेटा का?असा सवाल शिराळा तालुक्यातील शेतकरी वर्गातून संघटनाना होत  आहे.

डॉ. भारत पाटणकर  नेते श्रमिक मुक्क्ती दल


Post a Comment

0 Comments