शिराळा ,ता.१५: करुंगली -आरळा ता.शिराळा येथील शेडगेवाडी -चांदोली जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर निनाई (दालमिया) कारखान्या समोरील भोजनालयासमोर एम. ८०.मोटर सायकलला चारचाकी वाहनाने धडक देवून वाहन अंगावरून गेल्याने मोटारसायकलस्वार शिवाजी किसन सुतार (वय ५५ रा.चिंचेवाडी.ता.शिराळा) हे जागीच ठार झाले. हि घटना आज शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.याबाबत राहुल शिवाजी सुतार (वय ३० रा, चिंचेवाडी) यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत चारचाकी चालक ज्ञानेश्वर तुकाराम वाघमोडे (वय ३६ रा.सांगलीवाडी) याच्यावर कोकरूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कोकरूड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजी किसन सुतार हे निनाई (दालमिया ) कारखान्या समोर चांदोली -शेडगेवाडी या मुख्य रस्त्याने एम. ८०.मोटर सायकलने जात असताना त्यांना ज्ञानेश्वर तुकाराम वाघमोडे यांच्या चारचाकी वाहनाने जोराची धडक देवून गाडी त्यांच्या अंगावरून नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. एम. ८०.मोटर सायकलचे तीन हजाराचे नुकसान झाले. चालक अपघात स्थळी न थांबता निघून गेला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले सुना,नातवंडे असा परीवार आहे. पुढील तपास पोलीस हवलदार रेखा सूर्यवंशी करत आहेत.
0 Comments