शिराळा,ता.५: येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकारीपदी माळशिरस येथील नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे यांची नेमणूक झाली आहे.आज त्यांनी शिराळा नगरपंचायतचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
यापूर्वी शिराळा नगरपंचायत मध्ये मुख्याधिकारी म्हणून योगेश पाटील हे काम पाहत होते. त्यांची बदली महाबळेश्वर गिरीस्थान या ठिकाणी झाल्याने हे पद रिक्त होते . त्यांतर योगेश पाटील यांच्याकडे काहीकाळ अतिरिक्त पदभार सोपवला होता. शासन निर्देशानुसार आज दुपारी माळशिरस नगरपंचायत जिल्हा सोलापूर चे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी शिराळचा पदभार स्वीकारला. यावेळी प्रकाश शिंदे, आबाजी दिवाण,प्रीती पाटील, काजल शिंदे,लक्षमण मलमे, विजय शिंदे, गणपती यादव,सदानंद टिळे, मुनीर लंगरदार,नितीन कुरणे ,तात्यासो कांबळे,कृष्णात नलवडे,संतोष कांबळे,रंजना कांबळे,सुनील दाभाडे,उपस्थित होते.
0 Comments