गेले वर्षभर विविध विषयावर उत्कृष्ट वृत्तसंकलन केल्याबद्दल सांगली येथे सकाळचे संपादक मा.निखील पंडितराव यांच्या हस्ते शिराळा येथील सकाळ चे तालुका प्रमुख शिवाजीराव चौगुले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सहयोगी संपादक मा.शेखर जोशी सोबत सहायक सरव्यवस्थापक जाहिरात मा.आनंद शेळके, सांगलीचे वरिष्ठ व्यवस्थापक जाहिरात मा. उदय देशपांडे , वितरण विभाग प्रमुख मा. रामभाऊ लोकरे ,वरिष्ठ बातमीदार मा. जयसिंग कुंभार उपस्थित होते .
0 Comments