BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

व्हेल माशाच्या उल्टीच्या तस्करी प्रकरणी पाच जणांच्या टोळीला अटक |Gang of five arrested in case of smuggling of whale vomit



 

शिराळा,ता.१५ :सागाव ( ता.शिराळा ) येथे वनविभागाने व्हेल माशाची उल्टीची  (अंबरग्रीस ) तस्करी करणाऱ्या  सांगली,कोल्हापूर,लातूर जिल्ह्यातील  पाच जणांच्या  टोळीला बनावट ग्राहकाच्या मदतीने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्या कडून  ८ ग्रॅम उलटी चा नमुना , पाच मोबाईल , दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्यांना शिराळा न्यायालयात हजर केले असता  गुरवार ता.२१ डिसेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.पुढील तपासात आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस होण्याची दाट शक्यता असून  तपासात आणखी नावे निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या  घटनेमुळे शिराळा तालुक्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    सदर घटना आज शुक्रवारी  १५ रोजी सायंकाळी  चार वाजण्याच्या  सुमारास सागाव येथे  घडली. रोहन सर्जेराव पाटील (वय  २९ रा. कोनवडे ता. भुदरगड जि. कोल्हापूर), प्रथमेश सुरेश मोरे (वय २३ वर्षे रा.सोळंबी, ता. राधानगरी,जि. कोल्हापूर) , दिग्विजय उत्तम पाटील (वय २४ रा.सागाव, ता.शिराळा, जि. सांगली ), लक्ष्मण सुखदेव सावळे ( वय  ३४ रा.लातूर सध्या रा. कळंबोली मुंबई ) ,दत्तात्रय आनंदराव पाटील ( वय वर्षे ४१ रा. बिऊर ता. शिराळा, जि. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत वन विभागातून समजलेली  माहिती अशी , सागाव येथे व्हेल माशाच्या  उल्टीची तस्करी होत असल्याची माहिती वन विभागास गुप्त बातमी मिळाली होती. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी   सागाव येथील पेट्रोल पंपावर बनावट ग्राहक बनून गेले होते. त्यावेळी  संशयित दत्तात्रय पाटील हा ग्राहकांची भेट घेऊन  व्हेल माशाच्या  उल्टीचा नमुना दाखविण्यासाठी आणतो म्हणून गेला. नंतर अर्ध्या तासाने दत्तात्रय पाटील हा आपले सहकारी रोहन पाटील ,प्रथमेश मोरे,दिग्विजय पाटील,  लक्ष्मण  सावळे, दत्तात्रय पाटील असे पाच पेट्रोल पंपावर आले.त्यांनी बॅगेमध्ये असलेला व्हेल माशाची उल्टी (अंबरग्रीस ) चा  ८ ग्रॅम चा नमुना  दाखवली.  त्यावेळी बनवत बनावट ग्राहक असलेल्या ग्राहकाने याबाबत आपली  बऱ्याच व्यवहारात फसवणूक झाली आहे. त्यामुळे संपूर्ण मुद्देमाल पाहिल्यावरच व्यवहार करूया असे सांगितले. त्यावेळी सर्वजण चर्चा करत असताना त्यांच्याकडे असलेल्या मुद्देमालाची खात्री केली. त्यांतर  वन विभागाने त्या पाच जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतले. त्यांना शिराळा न्यायालयात हजर केले असता त्यांना गुरुवारी ता.२१ डिसेंबर पर्यंत वन कोठडी सुनवली आहे.

   ही कारवाई  वनविभागाचे सहाय्यक  वनसंरक्षक डॉ.अजित साजने, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल अनिल  वाजे, वनरक्षक हणमंत  पाटील,  विशाल डुबल, भिवा कोळेकर,  रजनिकांत दरेकर, बाबासो गायकवाड , मोहन सुतार यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments