BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वळचणीला चार बिबटे |Four leopards for Detour


शिराळा,ता.१:चांदोली अभयारण्या लगत असणाऱ्या ढवळेवाडी (ता.शाहुवाडी ) येथे आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. आठवड्यापूर्वी याच ढवळेवाडी पासून  काही अंतरावर असणाऱ्या तळीचावाडा येथील ८ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला  करून तिला ठार केल्याची घटना घडली होती.आज पुन्हा सुषमा राजाराम ढवळे १९ वर्षीय मुलीच्या डोळ्या समोर शेळीवर  हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने एक पिंजरा,आठ ट्रॅॅप कॅमेरे लावले असले तरी  बिबट्या कॅमेऱ्यात नाही तर अंगणात दिसतोय असे चित्र स्पष्ट झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, गणेश राजाराम ढवळे यांच्या पाच शेळ्या आहेत. तळीचावाडा येथे मुलीवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे  येथील शेतकरी भीतीपोटी जनावरे जंगलात अथवा रानात घेवून जात नाहीत.आपापल्या घरा शेजारी असणाऱ्या गवता जवळ  शेळ्या ,जनावरे चारण्यासाठी सोडत आहेत.त्या प्रमाणे आज शुक्रावर रोजी  त्यांच्या घराजवळ काही  अंतरावर सुषमा ढवळे शेळ्या चारत होती. त्यावेळी  महारपाणी ओढ्याच्या  बाजूने गवत व झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळीवर हल्ला केला. त्यावेळी डोळ्या समोर घडलेल्या घटनेने सुषमाच्या अंगचा थरकाप उडाल्याने तिने  आरडाओरडा केला असता घरा शेजारी असणाऱ्या संतोष कदम ,तुषार ढवळे ,दाजी ढवळे व इतर महिलांनी तिडके धाव घेऊ आरडाओरडा केला असता बिबट्याने आलेल्या मार्गाने पळ काढला. दोन  दिवसापूर्वी केळीचा डबरा येथे ही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. लोकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

 बिबट्याचा गावात येतोय पण कॅमेऱ्या नाही 

तळीच्या वाडयावरील मुलीवर  हल्ला केल्यापासून गेले आठ दिवस या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आठ ट्रॅॅप कॅमेरे लावले आहेत. सकाळ संध्याकाळ ड्रोनद्वारे  बिबट्याची शोध मोहीम सुरु आहे .पण त्यात त्याची हालचाल दिसून आलेली नाही.त्यामुळे या परिसरात अनेक बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 बिबट्या दारात बाहेर पडायचं कसं ?

आत्ता पर्यंत बिबट्याचं दर्शन शेतात आणि जंगलात व्हायचं पण आज आमच्या अंगणात बिबट्या आल्याने आम्ही घराबाहेर पडायचं कसं आणि मुक्या प्राण्याचा जीव वाचवायचा कसा. लहान मुलाबाळांचा जीव धोक्यात आला आहे.त्यामुळे वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा.

सहदेव ढवळे नागरिक ढवळेवाडी    

वळचणीला चार बिबटे 

साडे पाच वाजता बिबट्याने शेळीवर हल्ला केला.त्यानंतर साडे  आठ  वाजण्याच्या सुमारास नामदेव ढवळे व वसंत कवडे  यांच्या  घरच्या वळचणीला चार बिबटे दगडावर बसलेले आढळून आले. कुत्री भुंकण्याचा आवाज आल्याने वसंत कवडे यांनी बाहेर येवून पहिले असता त्यांना चार बिबटे दिसले.त्यामुळे  ग्रामस्थांची भांबेरी   उडाली. सायंकाळी  वाजल्या पासून वाडीत लाईट नसल्याने लोकांनी हातात बॅटऱ्या घेवून आरडाओरडा करत त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला आहे. 

       

Post a Comment

0 Comments