शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत खुली व्यायामशाळा,शुशोभिकरण ,किकेट, कबडडी, खो-खो, व्हॉलीबॉल,आयुर्वेद व हर्बल बगीचा,फुले,फळझाडे ,बांबुची लागवड ,गांडूळ प्रकल्प,शेततळे ,रेन वॉटर हारवेस्टींग अशा विविधांगी सुविधा निर्माण केल्याने आय.टी .आय.परिसर हा ग्रीन आयटी,आय पार्क म्हणून नावारूपास येवू लागला आहे. त्यामुळे शिराळा येथील बगीच्याची असणारी उणीव भरून निघण्यास मदत होणार आहे. येथे तयार झालेला हा ग्रीन आय,टी ,आय,पार्क हा शिराळा तालुक्याच्या पर्यटनाचा केंद्र बिंदू बनून तालुक्याचा लौकिकात भर घालणारा आहे.
. शिराळा बाह्यवळ रत्यावर शिराळा इस्लामपूर या मुख्य रस्त्या लागत औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. एकूण असणाऱ्या १७ एकरा पैकी संथेची इमारत व वसतिगृह सुमारे ३ एकरात आहे. उर्वरित १४ एकरात गवत उगवत होते. अनेक वेळा त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन गवत व झाडे जाळून खाक होत होती. या मोकळ्या जागेचा सदुपयोग व्हावा म्हणून प्राचार्य सुभाष भोसले यांनी जागतिक बँक प्रकल्पातील पब्लीक प्राव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) योजना सन २००८ पासून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करुन संस्थेत विविध बदल घडवून आणण्याचा सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न सुरु केला.
पुढील वर्षी फळबाग व बगीचा तयार करण्याचे नियोजन करून गत वर्षी संस्थेच्या आवारातील झांडाचा पालापाचोळा व शेणखत एकत्र करुन १.५ टण क्षमतेचा गांडूळ प्रकल्प उभारला. त्यात तयार झालेल्या सेंद्रिय खतांचा वापर करून आता फळझाडे व फुलांचा बगीचा तयार केला आहे. या मध्ये २ एकर परिरसरातील लॅण्डस्केपिंग करून अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध २७ प्रकारची फुलझाडांची लागवड केली आहे. एक एकर परिसरात आर्युवेद व हर्बल गार्डन तयार करण्यात आलेली असून यामध्ये तुळस, कोरफड, आडूळसा, गुळवेल, शेवगा, आवळा, गवती चहा अशा विविध प्रजातीची लागवड करुन परिसर प्रदुषन मुक्त व प्लॉस्टीक मुक्त केला आहे. ३ एकर परिसर मध्ये विविध ३०० फळझाडे लागवड करणेत आलेली असून यामध्ये पाच प्रकारचे कलमी आंबे, चिक्कु, पेरु, फणस, जांभळ अशाप्रकारे वृक्षलागवड करणेत आली आहे. अर्धा एकर परीसरात विविध प्रकारचे बांबुची झाडे लागवड केली असून २ एकर परिसरात सावली देणारी देशी वानाचे कदंब, बहुनिया अशी लागवड केली आहे.
मोकळ्या जागेत भोपळा, मेथी,कोथिंबीर ,वांगी, असा भाजपाला करण्यात आला आहे. त्यास ठिबकद्वारे पाण्याची सोय केली आहे. संस्थेच्या दर्शनी भागावर संस्थेचा नामफलक एल.ई.डी पध्दतीचा बसविलेला आहे. सध्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त असल्याने सामजिक बांधिलकीतून सर्वांसाठी खुली व्यायामशाळा सुरु केली आहे. यामध्ये एकूण १० प्रकारचे व्यायाम उपकरणे बसविण्यात आली आहेत.संस्थेच्या परिरसरात ३ एकर जागेमध्ये क्रीडांगण असून यामध्ये किकेट, कबडडी, खो-खो, व्हॉलीबॉल असे खेळांचे सर्व साहित्य उपलब्ध आहे.शिराळा परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असून ही उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असतेच, त्यावर मात करण्यासाठी बगीचा व क्रीडांगण यासाठी लागणारी माती काढल्याने तयार झालेल्या खड्ड्यात साडे पाच लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारुन वर्षभर पाणीपुरवठयाची सोय केली आहे. पावसाचे पाणी वाया न घालवता रेन वॉटर हारेस्टींग करुन पाणी पातळी वाढविण्यांत आलेली आहे.यासाठी संस्था व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासाहेब पाटील, सर्व संचालक, प्राचार्य सुभाष भोसले, प्रभारी गटनिदेशक व्ही. आर. चौगुले, मोहन कारंडे, तुषार बिचुकले व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी अपार कष्ट घेतले आहे.
नापीक असणाऱ्या जमिनीचा वापर योग्य पद्धतीने करून आम्ही सामजिक बांधिलकीतून या सोई सुविधा शिराळा शहरातील व येथे येणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी उपलब्ध केल्या आहेत.यात आणखी भर पडणार आहे. आम्ही सर्व शेतकऱ्याची मुल आहोत. कोणाचा ही सहारा न घेता आमच्या पद्धतीने आम्ही येथील रचना केली आहे.
प्राचार्य सुभाष भोसले आय.टी .आय.
साडे चारशे जणांचा राबता
बगीचा,फळ व फुल झाडांची निगा राखण्यासाठी प्रशिक्षणार्थी व आय,टी ,आय चे शिक्षक व कर्मचारी राबत आहेत. त्यामुळे एवढ्या परिसराची स्वच्छता व निगा राखणे शक्य होत आहे. येणारा भाजीपाला वसतीगृहातील मूल स्वयपाकासाठी वापरतात .
व्यवसाय शिक्षणा बरोबर शेतीचे धडे
येथील परिसर विकसित करताना आम्ही मुलांना त्यांचे व्यवसाय शिक्षण देत आहोत.त्याच बरोबर बगीचा,फुल व फळबाग,शेततळे,गांडूळ खत प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांना मिळू लागल्याने त्यांच्यात व्यवसाय शिक्षणासोबत शेतीची गोडी निर्माण होऊन त्याचं आत्मविश्वास वाढू लागला आहे.
पशु पक्षी आणि माणसांचा विचार
पर्यावरणाचा समतोल राखत येथे माणसाच्या आरोग्याचा विचार करून खुली व्यायाम शाळा,क्रीडांगण तर पक्षांच्या राहण्याची व खाण्याची सोय व्हावी म्हणून विविध फळबाग ,फुलझाडे,औषधी वनस्पती यांची लागवड केली आहे.
0 Comments