बांबवडे (ता. शिराळा ) येथे माने पाणंद रोड येथील चंद्रकांत शंकर माने यांच्या शेतातील जनावराच्या शेडमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात म्हैशीची १० व १५ दिवसाची दोन नवजात रेडक ठार झाली. ही घटना काल मंगळवार रात्री साडे नऊ ते आज सकाळी बुधवारी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.आठवड्यातील चौथी घटना घडल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
या बाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,चंद्रकांत शंकर माने यांचे माने पाणंद रोड येथे शेतात जनावराचे शेड आहे. त्या ठिकाणी जनावरे बांधून ते रात्री सव्वा नऊ वाजता घरी गेले.नेहमी प्रमाणे आज सकाळी साडे पाच वाजता वस्तीवर शेड मध्ये आले असता त्यांना एक रेडकु गंभीर जखमी झालेले तर दुसरे मृतावस्थे आढळून आले. त्यांचा शेडला पाच फुट उंचीची भिंत आहे.त्या भिंतीवरून उडी मारून बिबट्या आत गेला. भिंतीवरून उडी मारून रेडकाला बाहेत घेवून येत असताना भिंत पडली आहे.रेडकाला बांधलेली दोरी तुटली नसल्याने त्यास रेडकू नेता आले नाही.त्यामुळे रेडकू भिंती लागतच राहिले. माने यांनी या घटनेची माहिती वन विभागास दिली.घटनास्थळी वनरक्षक स्वाती कोकरे यांनी भेट देवून पंचनामा केला. या परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.
यावेळी दगडू कुंभार, दादासो शेटके, शिवाजी सावंत, सरपंच भीमराव ताटे,उपसरपंच दौलत जाधव,पोलीस पाटील धनंजय माने, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत हिंगणे,दीपक मोरे,कमल माने,दीपक गुरव,शरद माने ,आप्पासो पाटील,भीमराव माने,सर्जेराव कवचाळे,निवास ताटे उपस्थित होते. तीन दिवसापूर्वी याच परिसरात असणाऱ्या भुशारी वस्ती येथील विश्वास रंगराव पाटील यांच्या शेतातील जनावराच्या शेडमध्ये बांधलेली म्हैशीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते.उसतोड मजुरावर ही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.एका महिलेस बिबट्या गुरगुरत असल्याचा आवाज आला होता.
तो गुरगुरला आणि त्यांनी धूम ठोकली
काल मंगळवारी गणेश जाधव बेलवडेकर हे त्यांच्या जाधव वस्ती येथील मळीच्या शेतात उसाला पाणी पाजत असताना त्यांना उसाच्या सरीत बिबट्या दिसला.तो मोठ्याने गुरगुरताच जाधव यांनी आरडाओरडा करत तिथून धूम ठोकली. त्यामुळे आता शेतात जाताना ही लोकांना धास्ती वाटत आहे.
डोळ्या समोर कुत्र्यावर हल्ला
आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास दिलीप बारपटे व दीपक ताटे हे मेंढपाळ माने वस्तीवर मेंढर चारत असताना उसात असणाऱ्या बिबट्याने त्यांच्या कुत्र्यावर हल्ला केला.त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्या उसात पळाला.
या परिसरात आम्ही सायंकाळी पासून गती पथक सुरु करत असून त्या ठिकाणी रेस्क्यू टीम ही बोलावली आहे.लोकांनी बाहेर अथवा शेतात जाणताना एकटे जाऊ नये. आपल्या सह मुलांची व जनावरांची काळजी घ्यावी
एकनाथ पारधी वनक्षेत्रपाल शिराळा
पुन्हा जखमीवर पुन्हा हल्ला
बिबट्याने केलेल्या हल्यात एक रेडकू ठार तर दुसरे गंभीर जखमी होते. मात्र सायंकाळी चंद्रकांत माने बाहेर गेले असता पुन्हा बिबट्याने त्याच ठिकाणी येवून गंभीर जखमी असणाऱ्या रेडकावर हल्ला करून त्यास ठार केले.
0 Comments