शिराळा,ता. २४: शित्तूर वारुण( ता,शाहुवाडी) येथील चांदोली अभयारण्यालगत असणाऱ्या तळीचावाडा येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सारिका गावडे या मुलीच्या घटनेमुळे या परिसरात वनविभागाने गस्त सुरु केली असून या परीसारतील बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी आठ ट्रॅॅप कॅमेरे लावले आहेत. सकाळ संध्याकाळ ड्रोनद्वारे बिबट्याची शोध माहीम सुरु केली आहे. त्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
वन विभागाच्या वतीने तळीचा वाडा येथे घटना घडलेल्या परिसरात ८ ट्रॅॅप कॅमेरे लावले आहेत. सकाळ सायंकाळी ड्रोन द्वारे बिबट्याचा वावर कोणत्या क्षेत्रात आहे याची खात्री केली जात आहे. तसा बिबट्या एकवेळ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यासाठी पथक प्रमुख प्रदीप सुतार यांच्या सह आशुतोष सुर्यवंशी, अमोल चव्हाण, अलमतीन बांगी , राकेश शिखरे, विनायक माळी या सहा जणांचे जलद बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. रेसकू व्हॅॅन ही तयार ठेवण्यात आली आहे. यासाठी वनपाल दत्तात्रय जाधव, वनरक्षक बाळू लोखंडे,आफ्रीन देवळेकर ,प्रदीप वाडे , वनसेवक बळवंत बनसोडे, बाजीराव माईंगडे, शंकर जाधव, रंगराव भोसले, रामचंद्र केसरे, विष्णू कुंभार ,तुकाराम साळवी ,नामदेव दळवी असे वनविभागाचे बारा कर्मचारी त्या परिसरात गस्त घालून लोकांच्यात जनजागृती करत आहेत.
लोकांनी बिबट्या प्रवणक्षेत्रात काही दिवस जाणे टाळावे.ड्रोन कॅमेऱ्यात बिबट्या दिसला आहे. लोकांचा त्या परिसरात वावर आहे. काही ठिकाणी गवत काढणी सुरु आहे. जनावरे चारावयास नेली जात आहेत. मानवी वावरामुळे बिबट्या आपला मार्ग बदलत असल्याने तो लावलेल्या पिंजऱ्या जवळ येत नाही. त्यामुळे काही काळ लोकांनी त्या परिसरात फिरणे व गवत काढणे थांबवावे. लोकांनी आपली गैरसोय होत असली तरी सहकार्य करावे .
अमित भोसले वनक्षेत्रपाल मलकापूर
0 Comments