कोकरूड : ता.०९ :कोकरूड ता. शिराळा येथे शाहूवाडी तालुका हद्दीत कोकरूड-नेलेॅ पुलावरील तीव्र धोकादायक वळणावर गोव्यावरुन मुंबई ला जाणाऱ्या खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सच्या चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस पुलाच्या कठड्यास धडकून नदीत गेली. मात्र या कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत घटना स्थळ व पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, पावलो हॉलिडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स पणजी,गोवा येथून रात्री १ वाजता मुबंई-पुणे येथे जाणारे ४० प्रवासी घेऊन राजापूर - कराड- पुणे या राज्य महामार्ग १५० वरुन जाण्यासाठी अनुस्कुरा, अंबाघाट, मलकापूर मार्गे मुबंईला निघाली होती. दरम्यान सकाळी सहा वाजता कोकरूड -नेलेॅ पुलावरील धोकादायक वळणावर आली. बस आठ चाकी असल्याने इतर गाड्यांच्या तुलनेत मोठी असल्याने चालकाला वळणाचा अंदाज आला नाही.त्यामुळे बसला वळण न बसता पुलाच्या कठड्यास घासून ३० ते ३५ फूट खोल दरडीवरून खाली नदीत गेली.
त्रिमुखीय मार्ग धोकादायक
तिव्र उताराचे धोकादायक वळण, कोकरूड-नेर्ले - तुरुकवाडी असा त्रिमुखीय अरुंद रस्ता आहे. वळणाचा अंदाज न आल्याने बस मोठी असल्याने वळण न बसल्याने नियंत्रण सुटले.सुदैवाने बस पुलावरुन न कोसळता कठड्याला लागून सावकाश वारणानदीत उतरली. त्यामुळे आम्ही सुखरूप राहिलो .
ऋषिकेश भाट- अपघातग्रस्त बस चालक
तर मोठी दुर्घटना घडली असती.
पुला जवळील तीव्र धोकादायक वळण असल्याने नवीन वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यात अपघातग्रस्त बस ही आठ चाकी असल्याने व या मार्गावर चालक पहिल्यांदा आल्याने त्यास या वळणाचा अंदाज आला नाही. बस कठड्याला धडकून गेली. ज्या ठिकाणाहून बस खाली गेली त्या ठिकाणाहून या पूर्वी अनेक वाहने खाली गेली असल्याने तो एक मार्ग बनला.त्यात कोणताही अडथला नसल्याने बस अलगत खाली गेली. दुर्दैवाने बस पुलाच्या कठड्याच्या मध्यभागी घुसली असती तर पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली असती.
0 Comments