शिराळा,ता. २४: शित्तूर वारुण( ता,शाहुवाडी) येथील चांदोली अभयारण्यालगत असणाऱ्या तळीचावाडा येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सारिका गावडे हिच्या कुटुंबाला वन विभागामार्फत दहा लाखाचा धनादेश शाहुवाडीचे तहसीदार रामलिंग चव्हाणआणि मलकापूर वनक्षेत्रपाल अमित भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. उर्वरित १५ लाखांची मदत लवकरच देण्यात येणार आहे. त्या गावडे कुटुंबाला एकूण २५ लाखांची मदत मिळणार आहे.
यावेळी मयत सारिकाचे वडील बबन गावडे ,तानाजी वाघमोडे,वनपाल दत्तात्रय जाधव उपस्थित होते.सोमवारी सारिका आई समवेत घरा शेजारी असणाऱ्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्या परिसरातील गवत व झाडीत दाबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर पाठी मागून हल्ला केला होता. त्यावेळी तिच्या आईने आरडाओरडा केला असता बिबट्या पळून गेला.मात्र त्या बिबट्याच्या हल्यात सारिका जागीच गतप्राण झाली होती.बुधवारी गावडे कुटुंबियांच्या घरी जाऊन खासदार धैर्यशील माने यांनी त्यांचे सांत्वन केले.
0 Comments