इस्लामपूर : आरक्षण समजून घ्या.नुसता गोंधळ आणि गडबडून जाऊ नका.आपणाला चारी बाजूने घेरले आहे.सावध रहा गाफिल राहू नका. आपली जात वाचलीच पाहिजे. आपल्याला संपवायला बसले आहेत.आपल्या मुलासाठी लढा.आपल्यात मतभेद,राजकारण येऊ देऊ नका एकजूट कायम ठेवा आपल्या मुलांचे कल्याण होईल.१ डिसेंबर पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करा. जाळपोळ व आत्महत्या करू नका. आरक्षण घेतल्या शिवाय एक इंच मागे सरकणार नाही असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथे आयोजित मराठा आरक्षणाच्या सभेत बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले,सभेला जाताना रस्त्यात उभ्या असणाऱ्या मराठ्याला डावलूनपुढे जाण्याची माझी पैदास नाही.त्यामुळे सभाना वेळ होऊ लागला. आरक्षण असताना ही ते दिले नाही.याचे मोठे षडयंत्र आहे.
मी कोणाच्या वाट्याला जात नाही पण माझ्या आरक्षणाच्या आड आलं तर त्याला सोडणार नाही. माझ्या नादाला लागणाऱ्याला मी सोडत नाही. आमचे पुरावे सत्तर वर्षे का लपवले. आरक्षण न देण्याचा जाणूनबुजून कट रचला.आरक्षण देऊ नये म्हणून सरकारवर दबाव आणला. ७० वर्षा पासून आरक्षण दिले नाही याला जबाबदार कोण? पुरावे सापडले तरी आरक्षण नाही. निकष पार केले तरी आरक्षण नाही. जातीय दंगली घडवण्याचा त्यांचा विचार आहे.
७० टक्के लढाई मराठ्यांनी जिंकली आहे. मुलांच्या अन्नात माती कालवू नका.आंदोलन शांततेत करूया.सगळे पक्ष आपल्या बापजाद्यानी मोठे केले.पण मोठे केलेल्या पक्षाचा नेता आपल्या बाजूने एक ही नाही. ही चूक आपलीच आहे.आधी आरक्षण बघा मग पक्ष. महिलांनी गावोगावी आरक्षणाची जागृती केली तर मोठी क्रांती घडेल.
११ वाजून २२ मिनिटांनी सभा सुरु झाली १२ वाजुन २२ मिनिटांनी सभा संपली .
सहा तास प्रेक्षक वाट पाहत बसले.
0 Comments