शिराळा,ता.९:चिखली ता.शिराळा येथे शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सांगली जिल्हा पक्ष निरीक्षक व आयटी सेल चे प्रमुख सारंग पाटील व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाअध्यक्ष अविनाश पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,रणधीर नाईक,विराज नाईक, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, तालुकाध्यक्ष साधना पाटील,दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, बाळासाहेब पाटील, विश्वास कदम, सुरेश चव्हाण, बिरुदेव आमरे, सुकुमार पाटील, संदीप तडाखे, संभाजी पाटील, बाबासो पाटील, उपस्थित होते. हर्षद माने यांनी आभार मानले.
0 Comments