शिराळा : येळापूर (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. तानाजी पाटील यांची स्वराज्य सरपंच सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) च्या शिराळा तालुकाध्यक्षपदी निवड झाली.
नगर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत प्रदेशाध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. 'गाव खेड्याचा विकास हाच ध्यास' हे ब्रीद घेऊन संघटना राज्यभर काम करीत आहे. वैद्यकीय व्यवसायिक असलेल्या पाटील यांनी वर्षभरापूर्वी वेळापूरच्या सरपंचपदाची धुरा हाती घेतली. तेव्हापासून विविध योजना व उपक्रम राबवले. विकासकामांवर भर दिला आहे.
0 Comments