शिराळा : निगडी.(ता.शिराळा) येथील सर्जेराव बापूराव यादव (वय ७४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी (ता. ९ ) रोजी निगडी येथे सकाळी ९.३० वाजता आहे.
त्यांनी सांगली व सातारा जिल्हा शिवसेना माजी संपर्क प्रमुख,नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समिती माजी सभापती,अमृतवेल नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष, ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्था निगडी माजी अध्यक्ष या पदावर काम पाहिले. फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे माजी संचालक आनंदराव यादव यांचे ते बंधू होत.
0 Comments