BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वडीलच चालवत असलेल्या ट्रॅक्टर ला धडकून चिमुकल्याचा मृत्यू |A little boy died after hitting a tractor driven by his father



 शिराळा,ता.३: येथील औद्योगिक वसाहती मध्ये  वडीलच चालवत असलेल्या ट्रॅक्टरला धडकून एक वर्षाच्या चिमुकल्याचा  मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने सर्वत्र हाळहळ  व्यक्त होत आहे. हितेश सिहेनसिंग सिंगार (वय १ वर्षे, रा भेडदा, तहसिल पेटलावद, जिल्हा जाबुवा. राज्य मध्यप्रदेश सध्या रा. इनफ्रा मार्केट कंपनी , औद्योगिक वसाहत शिराळा) असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. ही  आज घटना शुक्रवार ता.३ रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.या घटनेची फिर्याद मयत हितेश ची आई किला सिहेनसिंग सिंगार  (वय २५ वर्षे, धंदा मजुरी  रा. भेडदा, तहसिल पेटलावद, जिल्हा जाबुवा , मध्यप्रदेश सध्या रा.इन्फ्रा मार्केट कंपनी ,औद्योगिक वसाहत शिराळा)  यांनी दिली आहे. याबाबत बालकाचा वडील  सिहेनसिंग पागला सिंगार  (वय ३० )  याच्यावर पोलिसात  गुन्हा दाखल झाला आहे.

   याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी , सिहेनसिंग पागला सिंगार हे  कुटुंब  मध्यप्रदेश मधून कामाच्या शोधात शिराळा येथे चार महिन्यापूर्वी आले आहे. शिराळा येथील  औद्योगिक वसाहतीमध्ये  इन्फ्रा मार्केट कंपनीमध्ये मजुरी करत होते. सिहेनसिंग सिंगार हा आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास इन्फ्रा मार्केट येथे   ट्रॅक्टर ट्रॉलीसह पाठीमागे घेत असताना ट्रॉलीच्या उजवे बाजूच्या चाकास हितेश धडकला. यामध्ये त्याच्या  डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास तातडीने  शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी  वैद्यकीय अधिकारी  डॉ. समाधान यमगर यांनी  हितेश हा मृत झाल्याचे घोषित केले.  त्या नंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या हितेशच्या  मरणास संशयित आरोपी सिहेनसिंग सिंगार  हा कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भाऊसाहेब कुंभार हे करीत आहेत. हितेश याच्या पश्चात आई ,वडील , बहीण  असा परिवार आहे. त्याचा  मृतदेह मध्यप्रदेश येथील मूळ गावी अंत्यसंस्कारसाठी नेण्यात आला आहे. 

  डोळ्या समोर स्वप्नांचा चुराडा 

 सिहेनसिंग सिंगार हा ३० वर्षाचा युवक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी कुटुंबासह राज्य सोडून कामधंद्याच्या निमित्ताने  महाराष्ट्रात आला. चार महिने सुखाने संसार सुरु होता. सिंगार कुटुंबीय मुलांच्या भविष्यासाठी प्रत्येक दिवस राबत होते. पण आजचा दिवस हा त्यांच्यासाठी काळा दिवस ठरले हे कोणाच्या स्वप्नात नव्हते. ज्याच्यासाठी जीवाचा आटापिटा सुरु होता .त्याचा शेवट आपल्या हातून होईल याची पुसटशी कल्पना त्या बाप्पाला नव्हती. नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होत.नकळत बाप्पाकडून मुलाचा घात झाल्याने डोळ्या समोरच  पोटच्या गोळ्याचा मृत्यू पाहिलेल्या आई बापांच्या त्याच्यासाठी पाहिलेला स्वप्नांचा व मुलाच्या आयुष्याचा चुराडा झाला. हे चित्र हृदय पिटाळून टाकणारे होते.  

बाळूत्यातून आणलेल्या बाळाला कफनातून नेण्याची वेळ 

सिहेनसिंग सिंगार कुटुंब चार महिन्या पूर्वी शिराळा येथे हसत खेळत आले. हितेश लहान असल्याने त्यास  बाळूत्यातून आणले.मात्र आज त्याच्यावर काळाने घाला घातल्याने  बाळूत्यातून अणेलेल्या हितेशला कफनातून नेण्याची वेळ येईल असा विचार कोणी स्वप्नात ही केला नव्हता. त्याचा मृतदेह  गावाकडे अशा अवस्थेत नेताना उपस्थित मजूर व कंपनीतील अधिकारी व कर्मचारी गहिवरून गेले. 


Post a Comment

0 Comments