शिराळा,ता.१६ : कापरी ता.शिराळा येथे मोठ्या भावाचा डोक्यात लाकडी दांडके घालून खून केल्या प्रकरणी १६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपी लहान भाऊ अविनाश राजेंद्र मोरे( वय २२) यास शिराळा पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही घटना शनिवारी मध्यरात्री रात्री १ वाजण्यापूर्वी घडली होती.पैशावरून झालेल्या भांडणातून महेश राजेंद्र मोरे (वय २७) या मोठ्या भावाचा डोक्यात लाकडी दांडके घालून संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे हा लहान भाऊन खून करून पसार झाला होता.याबाबत पोलीस पाटील बजरंग कुंभार यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानंतर अविनाश मोरेने पोलिसांच्या भीतीने स्वतः रविवारी ता.१२ रोजी रात्री शिराळा पोलीस ठाण्यात नमस्कार मी च अविनाश मोरे असे म्हणत मीच भावाचा खून केला असल्याची कबुली दिली. त्यास पोलिसांनी अटक करून शिराळा न्यायालयात हजर केले असता १६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनवली होती.आज त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील करत आहेत.
0 Comments