शिराळा,ता.९:राष्ट्रवादी पक्षाची बांधणी शिराळा तालुक्यात मजबूत झाली आहे.त्यामुळेच विविध संस्थांवर, ग्रामपंचायती, सोसायटी, नगरपंचायत, पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा परिषद आदींवर वर्चस्व असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक व आय.टी.सेलचे अध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक तरआमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाटील म्हणाले,सातारा,सांगली,कोल्हापूर जिल्ह्याला सारस्वत, कला, बुध्दी, राजकारण, इतिहास, स्वातंत्र्यची मोठी परंपरा व इतिहास आहे.देशाचे संविधान,आंबेडकर,शाहू,फुल्यांची पुरोगामी विचारसरणी वाचविण्यासाठी लढणाऱ्या ८३ वर्षाचा योध्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष,खासदार शरदचंद्र पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहा.
शिवाजीराव नाईक म्हणाले,शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकसंध आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे.नवीन सरपंचांनी विकासाची कामे भविष्यकाळात पूर्ण करा.
आमदार नाईक म्हणाले,मतदार संघात पक्षाची बांधणी मजबूत आहे.विरोधक जनतेला भूलथापा मारत आहेत.८० टक्के ग्रामपंचायत व सेवा सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या आहेत.पक्षाध्यक्ष,खासदार शरद पवार व माजी मंत्री,आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकीतही मोठे यश मिळवणार.
रणधीर नाईक म्हणाले,आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक मतदारसंघात मूलभूत प्रश्न मार्गी लावत आहेत. कार्यकर्त्यांनी एकत्र राहून, हातात हात घालून अशीच विकासकामे राबवूया.
विराज नाईक म्हणाले,पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. कांही लोक पक्षातून गेले, पण जनमत खासदार शरद पवार यांच्या सोबत आहे.विरोधक भूलथापा मारून फसगत करत आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीच्या दोन्ही टप्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहीले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,बाळासाहेब नायकवडी,प्रवीण कोपर्डे यांनीही मनोगत व्यक्त केले.
बैठकीसाठी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,भूषण नाईक, महिला जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव,तालुकाध्यक्ष साधना पाटील, विश्वासचे संचालक दिनकरराव पाटील,विजयराव नलवडे, बाळासाहेब पाटील,विश्वास कदम,सुरेश चव्हाण,बिरुदेव आमरे, सुकुमार पाटील,संदीप तडाखे,संभाजी पाटील,बाबासो पाटील, दत्तात्रय पाटील,विश्वास पाटील,वारणा कारखाना संचालक विजय पाटील,एम.एस.कुंभार,रघुनाथ पाटील उपस्थित होते.आभार हर्षद माने यांनी मानले.
१८ सरपंचांचा सत्कार
बाबासाहेब मुल्ला (फकीरवाडी),अभिजित पाटील(इंग्रुळ), विकास सावंत(चिखलवाडी),महादेव चव्हाण(आंबेवाडी),भीमराव ताटे(बांबवडे),लक्ष्मी डिगे(मोरेवाडी),आनंदा कुंभार(वाकुर्डे बुद्रूक),शंकर वाघ (अस्वलेवाडी),रुपाली सुतार (चिंचेवाडी),डी. बी.शिरसट (शिरसटवाडी,बाजीराव सपकाळ(रिळे),कोमल मस्कर (कुसळेवाडी),शितल मुदगे(कुसाईवाडी),दीपाली पाटील(पाचगणी),राजाराम धस(धसवाडी),सुरेखा जाधव (मादळगाव),वंदना जाधव(बेलेवाडी),वैशाली कांबळे (रांजणवाडी)
0 Comments