१५ ऑक्टोंबर पासून चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकासाठी सुरु झाले आहे. आता दिवाळी सुट्टी लागल्याने पर्यटकांची चांदोलीकडे धरण, अभयारण्य ,गुढे पाचगणी पवनचक्की पठार पाहण्यासाठी पावले वळू लागली आहे.
मे महिन्यात झालेल्या वन्यजीव गणनेत एका बिबट्यासह ३०८ श्वापदांची नोंद झाल्या आहेत . गतवर्षी कोरोनामुळे बुद्ध पौर्णिमेला वन्य प्राणी गणना करू नका , अशा सूचना दिल्याने वन्यगणना रद्द झाली होती .त्यापूर्वी २०२० मधील बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना झाली होती .वन्य प्राण्यांसह जंगल व वन्य प्राण्यांविषयी जागरूकता व्हावी , यासाठी वन्यजीव गणनेत लोकसहभाग वाढवला जात आहे . व्याघ्र प्रकल्पात उदमांजरसह राज्य प्राणी शेकरू , मोर , अस्वल यांच्या अस्तित्वाची नोंद झाल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या ढेबेवाडी , हेळवाक , चांदोली , कोयना , बामणोली या पाच वनपरिक्षेत्रात एकूण ५४ मचाणांवर निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत मे महिन्यात पाणवठ्यावरील वन्य प्राणी गणना पार पडली होती.त्या नुसार गणनेत बिबट्यासह १५ वन्यप्रजातीचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले होते.त्यामध्ये बिबट्या , गवा , सांबर , रानडुक्कर , ससा , पिसोरा , भेकर , अस्वल , वानर , सायाळ , मुंगूस , मोर , रानकोंबडी , शेकरू, उदमांजर व रात्री पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी ३०८ प्राणी आल्याची नोंद झाली आहे.
येथे पास उपलब्ध
चांदोली पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पास देण्याची व्यवस्था जाधववाडी येथील वन्यजीव विभागाच्या नाक्या वरती केली आहे.त्यासाठी आधार कार्ड, लायसन्स,मतदान ओळखपत्र या पैकी एकाची गरज आहे. खासगी बस असेल तर प्रत्येकाचे आधार कार्ड किवा इतर ओळखीचा पुरावा असणे गरजेचे आहे.शालेय सहलीसाठी शाळेचे पत्र आवश्यक आहे.
या सहलीसाठी ५० ते ७५ टक्के सूट
पर्यटनासाठी आलेल्या शिराळा तालुक्यातील शालेय सहलीसाठी ७५ तर सांगली जिल्ह्यातील शालेय सहलीला ५० टक्के सूट देण्यात आली आहे. जिल्ह्या बाहेरील सहलीसाठी सूट नाही.
पर्यटन शुल्क
बारा वर्षा खालील मुले - प्रत्येकी ५० रुपये
प्रौढ व्यक्ती -१०० रुपये .
गाईड शुल्क -२५० रुपये
वाहन प्रवेश - लहान १००,बस १५०
छोटा कॅमेरा -५० ,मोठा १००
वन्यजीव विभागाचे वाहन असल्यास - प्रत्येक मुलांसाठी २०० रुपये (प्रवेश शुल्क ५० , बस शुल्क १०० ,गाईड ५० ).प्रौढ व्यक्ती २५० रुपये ( प्रवेश शुल्क १०० ,बस शुल्क १०० ,गाईड ५०).
हे पहाल
चांदोली ते झोळंबी हा येण्या जाण्याचा ३२ किलोमीटरचा मार्ग आहे. दरम्यान पर्यटकांना विविध वनस्पती .फुले,पाखरे,पक्षी,प्राणी पाहवयास मिळतील.दरम्यान अनेक ठिकाणी निरीक्षण मनोरे आहेत.त्या वरून चांदोलीचे निसर्ग सौंदर्य पाहता येईल.
झोळंबी सडा पाहण्यासाठी २ किलोमीटर तर चांदोली धरणाचा दूरवर पसरलेला पाणी साठा पाहण्यासाठी जनीच्या आंब्या पासून ३ किलोमीटर पाऊलवाटा आहेत. हा जंगलातील पाऊल वाटेचा वेगळाच थरार अनुभवयास येतो.
पर्यटन गुरुवारी बंद
प्रत्येक गुरुवारी पर्यटन बंद असते.त्यामुळे कोणाला ही आत सोडले जात नाही. पास सकाळी सहा ते दुपारी तीन पर्यत दिले जातात. सायंकाळी सहा नंतर पर्यटन बंद होते.
असे जा पर्यटनाला
सांगली -इस्लामपूर -पेठ नका - शिराळा -कोकरूड -शेडगेवाडी -मणदूर - खुंदलापूर १३५ किलोमीटर
रत्नागिरी -आंबा -मलकापूर - कोकरूड -शेडगेवाडी -मणदूर - खुंदलापूर- १३० किलोमीटर
कोल्हापूर - बांबवडे - कोकरूड -शेडगेवाडी -मणदूर - खुंदलापूर-१०० किलोमीटर
कराड -पाचवडफाटा -शेडगेवाडी -मणदूर - खुंदलापूर - ८० किलोमीटर
0 Comments