BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोटरसायकल अपघातात शिक्षक जखमी Teacher injured in motorcycle accident

 

शिराळा,ता.१३: मांगले (ता.शिराळा) येथील शेवडेवस्ती  दरम्यान दोन मोटरसायकलच्या झालेल्या धडकेत शिंगटेवाडी  येथील जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक विलास दगडू पाटील (वय ४७  रा. मणदूर सध्या शिराळा ) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना  बुधवारी (ता.८ )रोजी   सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात मोटरसायकल स्वार घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्यावर  शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत जखमी विलास पाटील यांनी फिर्याद दिली आहे. शिराळा पोलीसातून समजलेली माहिती अशी,विलास पाटील हे  जिल्हा परिषद शाळा शिंगटेवाडी येथे शिक्षक म्हणून काम करीत असुन शिराळा कापरी नाका येथे आपल्या पत्नी व मुला समवेत रहात आहेत. 

८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास  ते  केंद्र शाळा येथील कामकाज संपवून मोटरसायकल क्रमांक एम.एच.०८ पी.७७८० वरून  मांगलेकडे जात  असताना शेवडेवस्ती जवळ समोरुन  भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने येणाऱ्या अज्ञात मोटरसायकल क्रमांक एम.एच.११ बी.पी.५६६१ ने विलास  पाटील यांच्या मोटरसायकलला  जोराची धडक दिली. 

त्यात त्यांच्या  पायास ,गुडघ्यास व मानेस गंभीर दुखापत झाली असताना अज्ञात मोटरसायकल स्वार हा तिथून निघून गेला. त्यावेळी स्थानिक लोकांनी १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना शिराळा उपजिल्हा रुग्णालया उपचारासाठी दाखल केले. तिथून  पुढील उपचारासाठी इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पोलीस त्या अज्ञात मोटारसायकल स्वराचा  शोध घेत असून पुढील तपास पोलीस हवलदार संदीप भानुसे करत आहेत. 



Post a Comment

0 Comments