शिराळा,ता.१३: शिराळा येथील कुमार लक्ष्मण माळी (वय ३०) रा.नवजीवन वसाहत शिराळा या युवकाने आत्महत्या केली आहे. याबाबत अरुण भोपाल माळी ( वय ३६) यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना आज ता.१३ रोजी सकाळी सात वाजण्या पुर्वी घडली. आत्महत्तेचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबबत शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, कुमार माळी याने राहत्या घरातील दोन नंबर खोलीत लाकडी तुळीला साडीने गळफास लावुन घेवुन आत्महत्या केली. ही घटना सकाळी सात वाजता निदर्शनास आली. पुढील तपास पोलीस हवालदार इरफान मुल्ला करत आहेत.
0 Comments