शिराळा ,ता.४:संकल्प फाउंडेशन शिराळा व शिराळा तालुका ओबीसी संघटनेच्यावतीने मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी शिराळा येथे ओबीसी प्रवर्गातील लोकांसाठी ओबीसी महामंडळ कर्ज योजना व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष रवी यादव यांनी दिली.
यावेळी यादव म्हणाले, मंगळवार ७ नोव्हेंबर २०२३रोजी सकाळी ११ वाजता संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन पोष्ट ऑफिस जवळ येथे या शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरात १ लाख रुपये थेट बिनव्याजी कर्ज योजना व वैयक्तिक व गट कर्ज परतावा योजनेची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ चे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या योजनेचा लाभ १८ ते ५० वय वर्ष गटातील लोकांना घेता येईल. ही योजना ओबीसी प्रवर्गातील बारावी पास विद्यार्थी किंवा आय.टी आय चे विद्यार्थी, व्यवसायिक ,अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, छोटे व्यावसायिक व उद्योजक, व्यापारी, भागीदारी करणारे लघु व मध्यम उद्योजक ,महिला बचत गट यासाठी उपलब्ध आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविली जात आहे .त्यांच्यासाठी माहिती व फॉर्म दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा .
0 Comments