शिराळा : मांगरुळ (ता. शिराळा ) येथील श्री चिंचेश्वर वाचनालयात 'एक दिवा सैनिकांसाठी' उपक्रम साजरा झाला. वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, विशेषतः स्त्री, पुरुष, युवक, युवती वाचकवर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय सीमेवर कर्तव्याचे पालन करताना जवान आपल्या परिवारापासून विशेषतः कोसो मैल दूर असतात. त्यामुळे त्यांना सण, उत्सव साजरा करता येत नसतात. त्या सैनिकांच्या सेवेप्रति वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, स्त्री, पुरुष, युवक, युवती वाचकवर्ग यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे सैन्यदलातील सेवेचे विशेष कौतुक केले.
देशसेवेच्या रक्षणार्थ असणाऱ्या सर्व दलातील सैनिकांप्रति, त्यांच्या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करणे करणे ही तशी प्रत्येक जागृत नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत मुंबईच्या भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळाचे अभिकर्ता सदाशिव शिंदे यांनी मांडले. वाचनालयाचे सचिव वसंत खवरे, शिक्षक निवास शिंदे, शिराळा आगारचे चालक एस. एन. पाटील, मुंबई-परेलच्या ग्लोबल हाँस्पिटलचे फार्मासिस्ट तात्यासो खांडेकर, सुदर्शन खवरे, वाचनालयाचा युवक,युवती वाचकवर्ग उपस्थित होता. आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर सैनिक महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळेच तर आपण सुखाने झोपतो, वाववरतो. सैनिकांचे स्थान हे अनन्यसाधारण असेच आहे.
आपल्या प्राणांची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करणारे 'सैनिक' हे प्रत्येक भारतीयांसाठी आदरणीयच असायला हवेत. त्यांच्या देशाप्रती होणाऱ्या सेवेचा सन्मान आदर विविधांगी कार्यक्रमांच्या औचित्याने व्हायला हवे.
श्री वसंत खवरे, सचिव, श्री चिंचेश्वर वाचनालय.
0 Comments