शिराळा,ता.१: तालुक्यातील सखल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार शामला खोत-पाटील यांना देण्यात आले.
अंबामाता मंदिरापासून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. तहसीदार कार्यालय येथे मोर्चाची सांगता करून आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे. सारथी संस्थेला भरीव निधीची तरतूद करून बळकटी द्यावी. तालुक्यात मराठी वस्तीगृह व मराठा भवन बांधावे. नव उद्योजकांसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून मिळणारे कर्ज विनातारण मिळण्यासाठी बॅंकांना आदेश काढावेत.
यावेळी उद्या गुरुवार ता. २ रोजी सायंकाळी सात वाजता शिराळा शहरातून कॅंडल मार्च काढण्यात येणार असून शुक्रवार ता. ३ पासून मरिमी चौक येथे साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चासाठी आलेल्या आंदोलकांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या देवेंद्र धस यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी रणधीर नाईक, विराज नाईक, रणजितसिंह नाईक, केदार नलवडे, पृथ्विसिंग नाईक, विजयराव नलवडे , अजय जाधव, अभिजित शेणेकर, अशोक गायकवाड, साधना पाटील, प्रतिभा पवार, विनोद कदम, बबलू कदम, सम्राट शिंदे, प्रतापराव यादव, प्रतापराव पाटील, संभाजी नलवडे, बंटी नांगरे, विजय महाडिक, देवेंद्र धस, सत्यजित कदम, विश्वास कदम, अमित गायकवाड, किर्तीकुमार पाटील, अविनाश खोत, संजय हिरवडेकर,प्रमोद पवार, संतोष हिरुगडे, प्रा.सम्राट शिंदे,राजू निकम.सुनील कवठेकर उपस्थित होते.
कडक पोलीस बंदोबस्त
काल मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र धस यांनी तहसीदार यांच्या दालनात घुसून अंगावर डिझेल ओतून घेल्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या आंदोलनासाठी खबरदारी म्हणून तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मुस्लिम समाजाचा पाठींबा
शिराळा तालुक्यातील सर्व मुस्लीम बांधव सकल मराठा समाजाच्या पाठीशी राहून आंदोलनात सक्रिय सहभागी होत आहे. असे निवेदन शिराळा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार शामला खोत-पाटील यांना देण्यात आले.यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष ॲड बाबासाहेब मुजावर, डि. जी. अत्तार, मेहबूब मुल्ला, शब्बीर मुल्ला, नसरुद्दीन मुल्ला, बशीर मुल्ला, खलिल मोमीन, सिकंदर पठाण, शफी अलाबक्ष, निहाल नदाफ, सैफ मुल्ला, वासिम मोमीन, सुहेल मुल्ला, फिरोज मुजावर, झाकीर दिवाण, नादीर मुजावर उपस्थित होते.
---------------------------------------------------------
0 Comments