शिराळा,ता.२६: आपली इच्छाशक्ती प्रबल ठेवून वाटचाल केल्यास किती ही अडचणी आल्या तरी आपण आपले ध्येय साध्य करू शकतो हे तेंडल्या सिनेमाच्या कलाकारांनी आपल्या कलेतून आणि कष्टाने सिद्ध करून दाखवले असल्याचे प्रतिपादन तहसीलदार शामला खोत पाटील यांनी केले.
शिराळा येथे तेंडल्या सिनेमाच्या कलाकारांनी सुरु केलेल्या खुळा पाटील या हॉटेल च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जगन्नाथ जाधव होते. पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक धर्मवीर पाटील यांनी केले. यावेळी डॉ,कालिदास पाटील, डॉ.आबासाहेब पाटील,सुर्यकांत शिंदे, विनोद घाडगे, सचिन जाधव, सुप्रिया जाधव, ओमकार गायकवाड, सुभाष जाधव, हर्षद केसरे,प्रतिक कांबळे,राज कोळी,राधिका कोळी उपस्थित होते. आभार सचिन जाधव यांनी मानले.
0 Comments