BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

के .बी. पी. निवासी शाळेतील मुलांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड |K.B. P. Selection of Residential School Boys for State Level Kabaddi Tournament



 शिराळा,ता.१ :रेड ता.शिराळा  येथील के .बी. पी. निवासी शाळेच्या मुलांची  गोंदिया  येथे झालेल्या १७ वर्षीय शालेय विभागीय कबड्डी स्पर्धेतप्रथम क्रमांक आला आहे.या मुलांनी  उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत चंद्रपूर,भंडारा,नागपूर शहर या संघावरती एकतर्फी मात केली. संघातील वेदांत जाधव, सुजल चव्हाण,आदित्य अंकले प्रेम नेर्लेकर यांनी उत्कृष्ठ चढाया तर ओमकार सावंत, वैभव कुंभार,शिवराज कुंभार यांनी उत्कृष्ठ पकडी केल्या.नागपूर विभागातून संघातील सर्व खेळाडूंची बीड येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना संस्थेचे संस्थापक विशेष पोलिस महानिरीक्षक  फत्तेसिंह पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, प्रशासक स्वाती बांदल,प्रशिक्षक भिमराव बांदल ,अजित शेळके, संग्राम पाटील,सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.संघातील खेळाडू वेदांत जाधव ( कॅप्टन ),ओंकार सावंत सुजल चव्हाण वैभव कुंभार,शिवराज कुंभार ,आदित्य अंकले सलीम मालदार, प्रेम नेर्लेकर, विनय पाटील ,अभिजित पाटील रणवीर पाटील, सत्यपाल चौहान, मनीष  आढे यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments