शिराळा,ता.८:संकल्प फाउंडेशन शिराळा व शिराळा तालुका ओबीसी व व्हीजेएनटी संघटना यांच्यावतीने ओबीसी प्रवर्गातील लोकांसाठी ओबीसी महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय कर्ज योजना व मार्गदर्शन शिबिर संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन शिराळा येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकल्प फाउंडेशन शिराळा व शिराळा तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष रवी यादव होते. स्वागत व प्रास्ताविक गणेश यादव यांनी केले. यावेळी योगेश सुर्यवंशी यांनी महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली. यामध्ये थेट कर्ज योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, वैयक्तिक व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना यावर मार्गदर्शन केले. कर्ज प्रस्ताव करताना लोकांना येणाऱ्या अडचणी या संदर्भातही माहिती दिली.
ओबीसी व्हीजीएनटी राज्य संघटक नंदकिशोर निळकंठ यांची सांगली जिल्हा गौण खनिज सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प माजी सभापती जगन्नाथ माळी, आकाराम गोसावी, सुभाष दळवी, गजानन सोनटक्के, मोहन जिरंगे, सचिन यादव, महादेव माने, अमोल काटकर, सुभाष कदम, गणेश रसाळ, नितीन यादव, रविंद्र यादव, अविनाश यादव, दत्तात्रय पाटील, संतोष बांदवडेकर, महादेव परीट, अमोल तेली, वैभव तेली, अनिल माने, रमेश शेटे, रत्नाकर कुंभार, राजेंद्र कबाडे, राजेंद्र कानकात्रे, सुरेश पिसाळ, नुरमहमंद नालबंद, प्रशांत गरगटे, गणेश लोहार, अजित कुंभार, उपस्थित होते.
0 Comments