शिराळा,ता.४: शिराळा तालुक्यातील २४ ग्रामपंचायतच्या उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती तहसीलदार शामला खोत पाटील यांनी दिली.
यावेळी खोत पाटील म्हणाल्या, शिराळा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या असून त्या पैकी करुंगली, धसवाडी, कदमवाडी, मादळगाव,बेलेवाडी या ५ ग्रामपंचायत बिनबिरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज रविवारी २४ गामपंचायत साठी मतदान होणार आहे. यासाठी ७१ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार आहे. या साठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १,२,३, व एक शिपाई असे ३५५ अधिकारी नेमण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक नेमण्यात आले आहे. ४५ अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत. काल शनिवारी सकाळी ८ वाजता तहसील कार्यालयात निवडणूक साहित्य वाटप करण्यात आले. ४ गावाकरिता १ असे ७ क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांची ने- आण करण्यासाठी १२ एसटी बस ,५ जिप गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना २४ गावातील मतदान केंद्रावर पोहच झाले आहे. आज रविवारी सकाळी साडे सात ते ते साडे पाच पर्यत मतदान होणार आहे. २९ सरपंच पदातील ६ बिनविरोध १ रिक्त तर २२ सरपंच पदासाठी ५६ उमेदवार तर २२१ सदस्य पदातील ६६ बिनविरोध १ रिक्त तर १५४ जागेसाठी ३४३ उमेदवार रिंगणात आहेत.
0 Comments