शिराळा:अंबामाता सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड शिराळा यांच्याकडून सभासदांना सहा टक्के लाभांश वाटप करण्यात आले. हा लाभांश संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव मुळीक उपाध्यक्ष संदीप कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.
यावेळी सेवा सोसायटीचे संचालक प्रवीण शेटे, संजय देशमुख, विष्णू यादव, निलेश देशमुख, सचिव विश्वास पाटील उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष प्रताप मुळीक म्हणाले,संस्थेची यावर्षी मेंबर पातळी व बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झालेली आहे.यासाठी सभासद,कर्जदार,संचालक व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केल्याने हे शक्य झाले.
0 Comments