BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आज तिसऱ्या दिवशी ११ ठिकाणी उपसरपंच निवडी Deputy Sarpanch elections in 9 places on second day today



 शिराळा,ता.२४  :शिराळा तालुक्यातील २९  ग्रामपंचायतच्या उपसरपंच निवडी  २२ ते २४ नोव्हेंबर बुधवार ,गुरुवार ,शुक्रवार अशी तीन दिवस सुरु असल्याने  शिराळा तालुक्यात  उपसरपंच निवडीसाठी  राजकीय वातावरण  तापले आहे.  नेत्यांचा कस पणाला लागणार आहे.

अनेक ठिकाणी  उपसरपंच निवडी बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली असली तरी पक्षांतर्गत असणारी बंडखोरी  थोपवण्याचे आवाहन नेत्यांच्या समोर आहे. काही ठिकाणी सरपंच आपल्या विचाराचा नसल्याने उपसरपंच आपल्या विचाराचा करण्यासाठी पक्षांतर्गत गटबाजी सुरु झाली असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची थेट लढत असली तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर सोयीच्या आघाड्या करून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे यावेळी अपक्षांना मोठी संधी आहे. सध्या २९ ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने आपल्या १७ तर राष्ट्रवादीने १८ ग्रामपंचायत असल्याचा दावा केला आहे. उद्या पासून उपसरपंच निवडी असल्याने आपल्या विचारांचे जास्ती जास्त उपसरपंच निवडून यावेत यासाठी नेत्यांच्या बरोबर स्थानिक गावधन्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

अनेक ठिकाणी संख्याबळ कमी असेल त्या ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजी हेरून विरोधकाला आमच्यात प्रवेश कर तुला उपसरपंच करतो असे अमिष दाखवले जात आहे . इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करत नेत्यांची मनधरणी सुरु केली आहे.  

आज येथे होणार  उपसरपंच निवडी

  इंगरुळ,मोरेवाडी,अस्वलेवाडी, मेणी, प. त. वारुण, चिंचेवाडी, मराठेवाडी, पाचगणी, मानेवाडी, कदमवाडी, कुसळेवाडी

 काल रिळे, आंबेवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, बेलेवाडी,  फकीरवाडी,  चिखलवाडी    

परवा  येथे झाल्या- बांबवडे, वाकुर्डे बुद्रुक, मादळगाव, शिरशी, धसवाडी, करूंगली, खुजगाव, रांजणवाडी, भाटशिरगाव.

 


Post a Comment

0 Comments