शिराळा,ता.१३: इंटरनेटच्या युगात सायबर क्राईम हा ज्वलंत विषय बनला आहे.त्यामुळे आर. बी.आय. सांगते त्याप्रमाणे लोकांनी सावधान रहावे .यावरती सतर्कता हाच खरा उपाय असल्याचे प्रतिपादन श्री दत्त नागरी पत संस्था उरूण- इस्लामपूर चे संचालक संगणक व इंटरनेट क्षेत्रातील तज्ञ अमित कुलकर्णी यांनी केले.
संस्थेच्या शिराळा शाखेत ग्राहक मेळाव्यात सायबर क्राईम या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थान संस्थापक चेअरमन प्राचार्य डॅा. पी. बी. कुलकर्णी होते.. स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॅा. श्रीकांत चव्हाण यांनी केले. यावेळी संस्थेचे सभासद सचिन शेटे यांची आनंदराव नाईक पत संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.सुखदा महाजन,प्रकाश नवांगुळ,सविता नलवाडे ,साधना पाटील,ॲड.नेहा सूर्यवंशी,डॅा. पी. बी. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुनिता कुलकर्णी,रमेश हसबनीस, कवी प्रा. प्रदीप पाटील, पांडूरंग काळे, सुनिता निकम ,प्रतिभा पवार, ॲड. नरेंद्र सुर्यवंशी,विजयराव कुलकर्णी, वसंतराव यादव, रमण शेटे,प्रा.आर. बी. शिंदे, प्रा. डी. एन. मिरजकर,दिलीप फल्ले,सुमंत महाजन, विजय पाटील, जगदीश गायकवाड, गणेश पाटील, केदार पोतदार, श्वेता जाधव, गणेश भस्मे उपस्थित होते. सूत्रसंचलन वारणा टिंगरे यांनी केले. आभार बी. टी. निकम यांनी मानले.
0 Comments