शिराळा तालुक्यातील २४ ग्रामपंचायतसाठी सोमवारी ता.६ रोजी सकाळी दहा वाजता तहसीदार कार्यालय येथे मतमोजणीस प्रारंभ होणार आहेत. ही मतमोजणी सहा फेरीत बारा टेबलवर होणार आहे. त्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी सकाळी ९ वाजता आपल्या ओळखपत्रा सह मतमोजणी केंद्रावर उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार शामला खोत पाटील यांनी केले आहे.
यावेळी खोत पाटील म्हणाल्या , पहिल्या फेरीत भाटशिरगाव,फकिरवाडी,इंगरुळ,चिखलवाडी, दुसऱ्या फेरीत शिरशी , आंबेवाडी , बांबवडे , मोरेवाडी,तिसऱ्या फेरीत वाकुर्डे बुद्रुक , अस्वलेवाडी , खूजगाव , चिंचेवाडी,चौथ्या फेरीत रांजणवाडी , सावंतवाडी , मेणी , शिरसटवाडी, पाचव्या फेरीत रिळे , खराळे , मराठेवाडी , कुसळेवाडी,सहाव्या फेरीत कुसाईवाडी , प.त.वारुण , पाचगणी ,मानेवाडी यांची मतमोजणी होणार आहे.मतदान असणाऱ्या सर्वच गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यासाठी सहा अधिकारी , १०८ कर्मचारी , ४६ होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अस्वलेवाडी ,चिखलवाडी ही दोन गावे संवेदनशील असून उर्वरित रिळे, शिरशी, वाकुर्डे बुद्रुक, बांबवडे, इंगरूळ, प.त. वारूण, खुजगाव, मेणी, सावंतवाडी,भाटशिरगाव ही १० गावे त्रासदायक आहेत.त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्या गावात किती उमेदवार, कोणत्या ग्रामपंचायत बिनविरोध ,कोणत्या गावात सरपंच व सदस्य बिनबिरोध झाले. कोणत्या गावात प्रभाग निहाय किती मतदान झाले. कोणत्या उमेदवाराला किती मते पडली. कोण विजयी पाहण्यासाठी खालील तक्त्या मधील ग्रामपंचायत वर क्लिक करून जाणून घ्या
0 Comments