BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भटवाडी -करमाळे येथील डोंगरास अचानक आग Bhatwadi - Karmale mountain suddenly caught fire

 


शिराळा,ता.२१ :भटवाडी -करमाळे ( ता.शिराळा ) येथील डोंगरास अचानक आग लागून सुमारे  सहा  एकर मधील वनविभाग व खाजगी क्षेत्रातील गवत व झाडे जळून खाक झाली. ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी  तीन तास ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याने  पुढील गवत व झाले वाचल्याने मोठा अनर्थ टळला.सदर घटना आज मंगळवार दि.२१ रोजी दुपारी बारावाजण्याच्या च्या दरम्यान घडली.

   याबाबत घटनास्थळा वरून समजलेली  माहिती अशी की,भटवाडी येथील वनविभागाचे तर करमाळे येथे खाजगी क्षेत्र आहे. वनविभागाने लिलाव करून या परिसरातील गवताची विक्री केली आहे. दुपारी अचानक करमाळे येथील खाजगी क्षेत्रातील गवतास आग लागली .ती आग भटवाडी येथील वनविभागाच्या क्षेत्रापर्यंत आली. यात खाजगी व  वनविभागाचे दोन्ही मिळून सुमारे सहा  एकर क्षेत्र जळून खाक झाले. यामध्ये प्रामुख्याने गवत , सागवान , जंगली वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यावेळी भटवाडी च्या सर्व ग्रामस्थांनी आणि  वनविभागाच्या अनिल बाजे , स्वाती कोकरे , वनमजुर आदींनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.. त्यामुळे वनविभागाचे तसेच खाजगी इतर क्षेत्र वाचले.आगीचे कारण  समजू शकले नाही.

चाऱ्याचा प्रश्न आणखी  गंभीर 

यावर्षी पाऊस वेळेत न पडल्याने आधीच गवताची वाढ खुंटली आहेत. त्यामुळे गवत उत्पन्न कमी होणार आहे.अद्याप लोकांनी गवत काढणी सुरु न केल्याने संपूर्ण गवत डोंगरात आहे. सध्या चारा टंचाई सुरु असताना आत्ता असणारे गवत ही जाळून खाक झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. येथील चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Post a Comment

0 Comments