शिराळा तालुक्यातील २९ पैकी २४ ग्रामपंचायतसाठी तणावपूर्ण वातावरणात काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता अत्यंत शांततेत ८५ .१७ टक्के मतदान झाले.मशीन बंद पडणे,उशिरा मतदान सुरु होणे असा कोणताही प्रकार घडला नाही.प्रभाग निहाय अत्यंत चुरशीने मतदान झाल्याने गुलाल आमचाच असे गणित मांडण्यास उमेदवार व कार्यकर्त्यांनी आकडेमोड सुरु केली आहे.सर्वात जास्त मतदान सावंतवाडी ९२.६२ तर सर्वात कमी खराळे येथे ७१.१४ टक्के झाले आहे.
शिराळा तालुक्यात २९ ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती.त्यामध्ये करुंगली, धसवाडी, कदमवाडी, मादळगाव,बेलेवाडी या ५ ग्रामपंचायत बिनबिरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित २४ ग्रामपंचायत साठी मतदान झाले.
कोणत्या गावात किती उमेदवार, कोणत्या ग्रामपंचायत बिनविरोध ,कोणत्या गावात सरपंच व सदस्य बिनबिरोध झाले. कोणत्या गावात प्रभाग निहाय किती मतदान झाले. कोणत्या उमेदवाराला किती मते पडली. कोण विजयी पाहण्यासाठी खालील तक्त्या मधील ग्रामपंचायत वर क्लिक करून जाणून घ्या
0 Comments