शिराळा तालुक्यातील २९ पैकी २४ ग्रामपंचायतसाठी काल रविवारी तणावपूर्ण वातावरणात अत्यंत शांततेत ८५ .१७ टक्के मतदान झाले.प्रभाग निहाय अत्यंत चुरशीने मतदान झाल्याने गुलाल आमचाच असे गणित मांडण्यास उमेदवार व कार्यकर्त्यांनी आकडेमोड सुरु केली आहे. करुंगली, धसवाडी, कदमवाडी, मादळगाव,बेलेवाडी या ५ ग्रामपंचायत बिनबिरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित २४ ग्रामपंचायतसाठी आज सोमवारी सकाळी शिराळा तहसीलदार कार्यालय येथे दहा वाजल्या पासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.
फेऱ्या व गाव
१ ) भाटशिरगाव,फकिरवाडी,इंगरुळ,चिखलवाडी,
२ ) शिरशी , आंबेवाडी , बांबवडे , मोरेवाडी,
३ ) वाकुर्डे बुद्रुक , अस्वलेवाडी , खूजगाव , चिंचेवाडी,
४ )रांजणवाडी , सावंतवाडी , मेणी , शिरसटवाडी,
५ )रिळे , खराळे , मराठेवाडी , कुसळेवाडी,
६ )कुसाईवाडी , प.त.वारुण , पाचगणी ,मानेवाडी
कोणत्या गावात किती उमेदवार, कोणत्या ग्रामपंचायत बिनविरोध ,कोणत्या गावात सरपंच व सदस्य बिनबिरोध झाले. कोणत्या गावात प्रभाग निहाय किती मतदान झाले. कोणत्या उमेदवाराला किती मते पडली. कोण विजयी पाहण्यासाठी खालील तक्त्या मधील ग्रामपंचायत वर क्लिक करून जाणून घ्या
0 Comments