BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास कारखाना गळीत हंगाम शुभारंभ |vishwas factory launch season

 चिखली (ता. शिराळा) : येथील विश्वासराव नाईक कारखान्याचा 49 वा सन 2023-24 सालाचा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ आज झाला.  हैद्राबाद येथील प.पू. सद्गुरू श्री. हरीभाऊ जोशी (निटूरकर महाराज), कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. दरम्यान वजन काटा व बैलगाडी पूजन संचालक विराज नाईक यांच्या हस्ते झाले. नव्याने उभारलेल्या इंजिनिअरींग विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांनी केले. 





अध्यक्ष, आमदार श्री. नाईक म्हणाले, हंगामात 7 लाख 50 हजार मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट आहे. या हंगामात 16 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रतिटन शंभर रुपये जास्त, 1 मार्च नंतर गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला प्रतिटन दोनशे रुपये जास्त व 1 मार्च नंतर ऊस पुरवठा करणाऱ्यांना ऊस उत्पादकांसाठी भाग्यवान सोडतीद्वारे बक्षीसे देण्यात येतील. त्यामध्ये 50 टनापेक्षा जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या 3 विजेत्यांना प्रत्येकी 10 ग्रॅम सोने, 40 ते 49 टन ऊस पुरवठा करणाऱ्यांना 3 भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी 5 ग्रॅम सोने, 30 ते 39 टन ऊस पुरवठा करणाऱ्यास 3 भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी 3 ग्रॅम सोने, 20 ते 29 टन ऊस पुरवठा करणाऱ्यास ऊस पुरवठा करणाऱ्यास 3 भाग्यवान विजेत्यांना 2 ग्रॅम सोने अशी बक्षीसे देण्यात येतील. याशिवाय सन 2022-23 मध्ये गाळपास ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन अर्धा किलो साखर दिपावली भेट म्हणून सवलतीच्या दरात देण्यात येईल. ऊस उत्पादकांना पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे नोंदवून व पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन केले. 

यावेळी फत्तेसिंगराव नाईक दुध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, ‘प्रचिती’ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक, शिराळ्याचे माजी सरपंच प्रमोद नाईक, संचालक सर्वश्री, दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, सुरेश पाटील, हंबीरराव पाटील, विष्णू पाटील, सुरेश चव्हाण, विश्वास पाटील, संभाजी पाटील, यशवंत निकम, आनंदा पाटील, बाळासाहेब पाटील, बिरु आंबरे, संदीप तडाखे, सुहास पाटील, तुकाराम पाटील, बाबासो पाटील, अजित पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह विश्वास पाटील, कोंडीबा चौगुले, कार्यकारी संचालक अमोल पाटील सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद, मान्यवर, कामगार उपस्थित होते. प्रारंभी मुख्य शेती अधिकारी ए. ए. पाटील यांनी स्वागत केले. कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments