BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा:विभागस्तरीय  स्पर्धेसाठी निवड झालेल्या विध्यार्थ्या समवेत प्रशिक्षक   

शिराळा,ता.१६: रेड ( तालुका -शिराळा ) येथील के.बी.पी.निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पावसाळी शालेय क्रीडा  स्पर्धेत यश मिळवले. सतरा वर्षाखालील संघाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. विजयी संघाची गोंदिया येथे होणाऱ्या विभाग स्तरीय  स्पर्धेसाठी निवड झाली आहे.विजयी संघात वेदांत जाधव,आदित्य अंकले,विनय पाटील, ओमकार सावंत, प्रेम नेर्लेकर, अभिजित पाटील,वैभव कुंभार,शिवराज कुंभार,सलीम मालदार,सुजल चव्हाण,सत्यपाल चव्हाण, मनीष आढे, रणवीर पाटील आदी खेळाडू आहेत.विजयी संघाचे शाळेचे संस्थापक माजी विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील.अध्यक्ष  संग्रामसिंह पाटील,प्रशासक स्वाती बांदल यांनी अभिनंदन केले.त्यांना प्रशिक्षक भिमराव बांदल,संग्राम पाटील, अजित शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments