BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संघर्षरत सत्यजित देशमुख |Struggling Satyajit Deshmukh



 भारतीय जनता पार्टीचे हातकणंगले लोकसभा निवडणूक प्रमुख, सांगली जिल्ह्यातील युवकांची नवी आशा; युवा नेतृत्व,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक एक अभ्यासू नेतृत्व सत्यजित देशमुख भाऊ यांचा  आज वाढदिवस. त्यानिमित्त .....

     महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारे, अजात शत्रू म्हणून सर्व परिचित असणारे सर्वपक्षीयांशी सौधार्यपूर्ण व सलोख्याचे सबंध असणारे विधानपरिषदेचे माजी सभापती, डोंगरी विभागाचे शिल्पकार, ज्येष्ठ नेते म्हणून शिवाजीराव देशमुख साहेबांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. शिवाजीराव देशमुख साहेबांनी  प्रत्येक कार्यकर्त्याला नवा विचार, दिशा आणि संस्कार देण्याचे काम सातत्याने केले होते. त्यांचाच आदर्श डोळयांसमोर ठेवून शिराळा व वाळवा तालुक्यासाठी अहोरात्र झटणारे एक निगर्वी आणि स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली ते  युवकांचे आशास्थान भाजपचे नेते, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक अभ्यासू संचालक म्हणून  सत्यजित भाऊ देशमुख यांनी अल्पावधीत शिराळा वाळवा तालुक्यात सर्वसामान्य जनतेमध्ये  आदराचे स्थान निर्माण केले आहे. भाजपाचे महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हृदय सिंहासनावर गारुड घालणारे युवा कार्यकर्ते अशी ओळख निर्माण केली आहे. आज टीम सत्यजित च्या माध्यमातून त्यांनी शिराळा वाळवा तालुक्यात व मुंबईस्थित युवकांच्या मध्ये युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले आहे त्यांनी युवा वर्गामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

 

      सत्यजित भाऊंनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये काम करीत असताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कसे सुटतील याकडे सातत्याने पाहिले आहे. गावागावातील डोंगर वस्तीवरील लोकांच्या प्रश्नासाठी तत्परतेने धावून जाऊन त्यांचे काम मार्गी लावणारे नेतृत्व  म्हणून त्यांची ख्याती आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व बांधकाम सभापती म्हणून काम करण्याची त्यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातील गावागावात विकासकामे पोहोचण्याच्या हेतूने भारत निर्माण योजना, शाळा खोल्या बांधकाम, अंगणवाड्या बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्टीय पेयजल योजना, पशुवैद्यकीय दवाखाने, सांस्कृतिक सभागृह, पुल रस्ते,आदी विकास कामांसाठी मोठया  निधी उपलब्ध करून कामे पूर्ण केली. तसेच तत्कालीन विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या माध्यमातून स्थानिक विकास निधी मंजुरीसाठी प्रयत्न केले.

    भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील जबरदस्त व भारदस्त नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयावर आपल्या लोभस व प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची छाप सत्यजित भाऊ यांनी सोडले आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांना व योजनांना विकास कामांना भरघोस निधी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी मंजूर करून आणला आहे.अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत, व अनेक प्रस्तावित कामे लवकरच मार्गी लागतील हे केवळ सत्यजित भाऊ यांची दूरदृष्टी व कामसू वृत्ती यामुळे घडत आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट सत्यजित भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाने होत आहे. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांना एकदा आमदार झाल्याचे पाहायचे आहे.

   सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून संचालक म्हणून काम करीत असताना जिल्ह्याबरोबर तालुक्यातील अनेक युवकांना या बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळेच शिराळा विधानसभा मतदारसंघात अनेक उद्योगधंदे युवकांनी उभे केले आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे पश्चिम घाटसारख्या विकास योजना अंतर्गत सर्वात जास्त निधी उपलब्ध करून पश्चिम भागाचा कायापालट केला याचे सर्व श्रेय सत्यजित भाऊंनाच जाते. 

     रेड ता. शिराळा येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी त्यांनी केलेली शैक्षणिक संकुलाची उभारणी आणि व्यवसायिक शिक्षणाची नवनवीन दालने ग्रामीण भागातील मुलांना संजीवनी ठरत आहे. देशमुख साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून विकासकामांचा डोंगर उभा करू शकणारे तालुक्याला लाभलेले प्रभावी, अभ्यासू  व गतिमान नेतृत्व म्हणजे सत्यजित देशमुख भाऊ यांच्याकडे पाहिले जाते. शिराळा औद्योगिक वसाहत  एम. आय. डी . सी. मध्ये दोन मोठे प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. ते अंत्यत चांगल्या पद्धतीने चालू आहेत.

     शिराळा पश्चिम भागामध्ये मागील वर्षी आलेल्या महापुराने अक्षरश: शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले अशा कठीणप्रसंगी सत्यजित भाऊंनी प्रत्येक गावचा, वाडी वस्तीचा दौरा करून शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आधार दिला. शासन दरबारी मदतीसाठी प्रयत्नशील  राहिले. सध्या कोरोनोच्या महामारीच्या संकटामुळे   रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेल्या   गरजू लोकांना  सुरवातीस तालुकाभर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.लॉकडाऊन चालू झाल्यापासून टीम सत्यजितने शिराळा वाळवा मतदारसंघात तसेच सांगली जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वपूर्ण अशी मदत केली आहे.  

      सत्यजित देशमुख भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली इमर्जन्सी असणाऱ्या पेशंटसाठी ऑक्सिजन, खेडेगावातील आशा सेविका यांच्यासाठी मास्क सॅनिटायझर, शिराळा उपजिल्हा रुग्णालयासाठी किट, तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी किट, ज्या गावांमध्ये सुरुवातीच्या काळात कंटेनमेंट झोन प्रशासनाने बनवला होता त्याकाळात शेतकऱ्यांसाठी व  गुरांसाठी चारा सुद्धा पोहोच केला. तसेच कोरोना रुग्णांना ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देणे,  इतर अडीअडचणी सोडविणे, त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या  समस्या सोडविण्यास ते नेहमी प्रयत्नशील आहेत.  सत्ता  असो वा नसो आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी लोकांचे प्रश्न प्रामुख्याने सोडविणे हा त्यांचा  स्थायीभाव आहे.

      सध्या  टीम सत्यजितच्या माध्यमातून होत असलेल्या सर्वसामान्यांना  लोकांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरु असणारे समाजकार्य कौतुकास्पद आहे. तसेच भाजप  पक्षाच्या विचारधारा, त्यांच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे तळागळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यजित देशमुख भाऊ नेहमी प्रयत्नशील आहेत.

     सत्यजित भाऊ यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे शेकडून युवा कार्यकर्ते कार्यकर्ते या मतदारसंघात आहेत. त्या सर्वांना सत्यजित भाऊ यांना पक्षाच्या माध्यमातून चांगल्या जबाबदार पदावर आरुढ झालेले पहावयाचे आहे. त्यांच्या अपेक्षा भारतीय जनता पार्टी लवकरच पूर्ण करील, अशी अपेक्षा बाळगून कार्यकर्ते आहेत. अशा या कर्तबगार व धडाडीचे नेतृत्व गुण असणाऱ्या युवा नेतृत्वास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा...

मा. प्रतिक बागणीकर युवा नेतृत्व  




हातकणंगले लोकसभा निवडणूक प्रमुख आणि  शिराळा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी व डोंगरी विभागाचे शिल्पकार विधानपरिषदेचे माजी सभापती स्व.शिवाजीराव देशमुख यांच्या अधुऱ्या असणाऱ्या स्वप्नपूर्ती व या मतदार संघाच्या विकासासाठी अनेक आव्हानांना तोंड  देत अविरतपणे झटणाऱ्या व युवकांची धडकन असणाऱ्या आणि भाजप  ज्यांच्याकडे या मतदार संघाचे  एक खंबीर व उमदे नेतृत्व म्हणून पाहत आहे अशा  सांगली  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक  सत्यजित देशमुख (भाऊ) यांचा आज वाढदिवस .त्या निमित्त . 

   विधान परिषदेत माजी सभापती डोंगरी विभागाचे शिल्पकार दिवंगत शिवाजीराव देशमुख साहेब यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. साहेबांनी कार्यकर्त्यांंना नेहमीच  नवे विचार व  दिशा देण्याचे काम सातत्याने केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सत्यजित देशमुख भाऊ राजकारणात सक्रिय झाले.  त्यांनी अल्पावधीत सामाजिक बांधिलकी व अभ्यासू वृतीने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख  जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण  महाराष्ट्राला करून दिली.  

भाजपचे खंबीर व उमदे नेतृत्व -सत्यजित देशमुख भाऊ | Strong and noble leadership of BJP - Satyajit Deshmukh bhau  


      भाऊंंनी राजकीय बारकावे देशमुख साहेबांच्याकडून आत्मसात करून  घेतले. त्याचा उपयोग  त्यांनी जिल्हापरिषदेत काम करत असताना केल्याने त्यांचे अभ्यासू नेतृत्व उदयास आले. त्यांनी देशमुख साहेब व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून   पाणी  योजना, शाळा, अंगणवाडी बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र, ,पशुवैद्यकीय दवाखाना, रस्ते, पुल सभागृह, आधी विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून कामे पूर्ण केली आहेत. संघटन, कौशल्य, अभ्यासु वृत्ती, अचूक निर्णय शक्तीच्या जोरावर आणि सर्वसामान्यांच्या आशीर्वादाच्या बळावर ते यशस्वी होत आहेत. 

भाजपचे खंबीर व उमदे नेतृत्व -सत्यजित देशमुख भाऊ | Strong and noble leadership of BJP - Satyajit Deshmukh bhau  


भाजपचे खंबीर व उमदे नेतृत्व -सत्यजित देशमुख भाऊ | Strong and noble leadership of BJP - Satyajit Deshmukh bhau  

भाऊंना महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात एक अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाते. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या भाऊंंना   शिराळा विधानसभा मतदार संघाच्या  सर्वांगीण विकासाची तळमळ असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सांगली जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले. जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगला लौकिक मिळवला. सध्या ते जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे  यासाठी निनाईदेवी शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना  केली. श्री. शिवाजीराव देशमुख ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट रेड-शिराळा असे शिक्षणाचे मोठे दालन उभे केले. यामध्ये विविध शाखांचे उपक्रम उपलब्ध आहेत.  तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी व शेतकरी कष्टकरी जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी साईराज औद्योगिक संस्था व स्वयंम अॅग्रो प्रोसेसिंग सोसायटी याची एमआयडीसी शिराळा येथे  उभारणी करून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

भाजपचे खंबीर व उमदे नेतृत्व -सत्यजित देशमुख भाऊ | Strong and noble leadership of BJP - Satyajit Deshmukh bhau  


भाजपचे खंबीर व उमदे नेतृत्व -सत्यजित देशमुख भाऊ | Strong and noble leadership of BJP - Satyajit Deshmukh bhau  

खरे तर भाऊंंच्याकडे असणारे संघटन कौशल्य व अभ्यासू वृत्ती यामुळे त्यांच्याकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. या पुढील काळात देशमुख साहेबांची विचारसरणी जोपासणारे कार्यकर्ते व वाढत्या  युवा वर्गाच्या  पाठींब्यावर साहेबांनी पाहिलेले आमदारकीचे स्वप्न भाऊ नक्कीच पूर्ण करतील   याचा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे. भाऊ  आपणास वाढदिवसाच्या  व आपल्या पुढील वाटचालीस  लाख लाख शुभेच्छा.

मा. जगदीश कदम तालुकाध्यक्ष भाजप विध्यार्थी आघाडी 



Post a Comment

0 Comments