BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुका व जिल्हा स्पर्धेत विश्वसेवा शिक्षण संकुलाच्या विध्यार्थांची बाजी |Vishwaseva Education Complex students win in taluka and district competition



 धनाजी पाटील :ऐतवडे खुर्द

नवजीवन शिक्षण संस्था संचलित विश्वसेवा शिक्षण संकुलातील १४, १७ , व १९ वर्ष वयोगटामध्ये विदयार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात तालुका व जिल्हा स्तरावर घवघवीत  यश संपादन केले . इस्लामपूर उर्दू हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या १४ वर्षाखालील वैयक्तिक मल्लखांब स्पर्धेत सुमित  कोळपे (इ.७ वी) याने जिल्हास्तरीय पातळीवर निवड झाली. दुसरा क्रमांक  एस.के. इंटरनॅशनल स्कूल रेठरे धरण येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात ४४ किलो वजनी गटात  प्रणव  पवार (इ. ८ वी) याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला . यश तोरस्कर (इ ८ वी ) याने दुसरा क्रमांक पटकावला. याच खेळात १७ वर्ष वयोगट ४८ किलो वजनी गटात  समर्थ काळे (इ ११ वी)  याने  तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला. कब्बडी खेळात १९ वर्ष वयोगटात संघाने तालुका स्तरावर   प्रथम क्रमांक मिळवला .  १७ वर्षे  वयोगट तालुका स्तरावर ३ रा क्रमांक व १४ वर्ष वयोगटाने २ क्रमांक पटकावला.वैयक्तिक खेळामध्ये १९ वर्षे  भाला फेक मध्ये  प्रेम  निकम (इ. १२ वी) याने तालुक्यात २ रा क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर निवड प्राप्त केली. थाळी फेक मध्ये  अमृत  पाटील (इ ११ वी) याने ३ रा क्रमांक पटकावला.

तालुका स्तरीय अथलेटिक्स खेळ प्रकारात १९ वर्ष वयोगटात २०० मी धावणे वैभव  कदम (इ. १२ वी) याने ३ रा क्र., यश  गहीन (इ १२ वी) ३०० मी धावणे ३ रा क्र., १५०० मी. धावणे विश्वास  लाहीगडे ( इ १२ वी) २ रा क्रमांक पटकावून जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी स्थान मिळवले. ५ कि. मी चालणे स्पर्धेत यश  गहीन याने प्रथम क्रमांक मिळविला 

तालुका स्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत यश गहीन व विश्वास लाहीगडे या  प्रथम क्रमांक मिळवून. जिल्हा स्तरीय स्पर्धेत धडक घेतली. तर ४ x ४०० रिले स्पर्धेत सहभागी खेळाडू  निशांत घोडके, अभिषेक कुकडे, वैभव कदम, यश हीन, विश्वास लाहीगडे यांनी तालुक्यात ३ रा क्रमांक प्राप्त केला.सर्व यशस्वी खेळाडूना नवजीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक  उत्तम पाटील , क्रीडा शिक्षक प्रशांत पवार,  रविराज पाटील, विश्वजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. नितीन कदम, राहुल शिंदे, प्रवीण बनसोडे, सुदीप माळी, चंद्रकांत जाधव, के. एस. पाटील सर, मुख्याध्यापिका. सुरेखा यादव, लता पाटील, सारिका पाटील, नंदिनी पाटील, माधुरी कांबळे, प्रज्ञा पाटील, प्रीती पाटील, अस्मा मुल्ला, मीना शिंदे, सविता कुंभार, सोनाली कुंभार, मनोहर मोरे, स्वप्नील चव्हाण या  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्यांना  शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments