शिराळा,ता.२३: शिराळा तालुक्यात सोयाबीन व इतर धान्याची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वजन काट्यांची व मॅइशचर मीटरची तपासणी साठी शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीने भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सभापती पोपट चरापले व उपसभापती विजय महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे, शिराळा तालुक्यात सोयाबीन व इतर धान्याची काढणी सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्री करताना बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्याकडे करावी. त्या व्यापाऱ्या कडून विक्री केलेल्या मालाची छापील पावती सही शिक्याने घावी.त्याच वेळी शासनाच्या सवलतीचा लाभ मिळेल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समितीच्यावतीने भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. त्या पथकाच्या माध्यमातून न्याची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वजन काट्यांची व मॅइशचर मीटरची तपासणी केली जाणार आहे.त्यामुळे व्यापारी बांधवानी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देवून त्यांचे नुसकान अथवा फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या दुकानात दर फलक लावावेत.अन्यथा जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 Comments